शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कारवायांच्या नावावर आष्टी तालुक्यात एलसीबीचा धुडगूस

By admin | Updated: December 31, 2014 23:28 IST

पोलिसांचा तिसरा डोळा असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सध्या आष्टीत तालुक्यात चांगलाच धुडगूस घातला आहे. कारवाया दाखविण्यासाठी हे पथक कुणाच्याही घरात झडती

पोलिसात तक्रार : महिला शेतकऱ्याच्या घरून ४० हजार पळविलेआष्टी(श.) : पोलिसांचा तिसरा डोळा असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सध्या आष्टीत तालुक्यात चांगलाच धुडगूस घातला आहे. कारवाया दाखविण्यासाठी हे पथक कुणाच्याही घरात झडती व संशयाच्या नावावर घुसून नाहक त्रास देण्याचा प्रताप करीत असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. याबाबत एका पीडित शेतकरी महिलेने पोलीस अधीक्षकांना पाठविलेल्या तक्रारीवरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या या अफलातून कारवाया पुढे आल्या. सदर तक्रारीनुसार, दि.२३ डिसेंबर रोजी आष्टी येथील महिला शेतकरी सुमन मारोती पाटील यांनी मौजा डोंगरगाव येथील तीन एकर शेतीतील कापूस विकला. मिळालेला ४० हजार रुपयांचा चुकारा घरी आणून ठेवला आणि ती घराला कुलूप लावून परत शेतात गेली. दरम्यान दुपारी ३ वाजता वर्धा येथील स्थानिक गु्न्हे शाखेच्या तिचे घर गाठून कुलूप तोडून आत प्रवेश केला. माहिती मिळताच सदर महिला घरी आली. यावेळी या पथकाने तिचा मुलगा प्रमोद याच्याबाबत माहिती विचारली. तेव्हा तिने पटत नसल्यामुळे मुलगा विभक्त राहतो, असे सांगितले. तरीही घराची झडती घेतली. अन्नधान्य फेकून दिले. डब्यामंधील पदार्थ जमिनीवर अस्ताव्यस्त फेकून त्यावर पाणी टाकले. तसेच पलंगाच्या गादीखाली कापसाचे चुकाऱ्याचे ४० हजार जबरदस्तीने काढून घेतले. अश्लील भाषेत शिवीगाळही केली. काहीएक न ऐकून न घेता ते निघून गेले. लगेच तक्रार नोंदविण्यासाठी पोलीस ठाण्यात गेली. स्टेशन डायरीवर कार्यरत जमादार खोब्रागडे याने तक्रार घेण्यास नकार दिला. ही बाब त्या पथकाला सांगितली. पुन्हा पथकाने महिलेचे घर गाठून ४ हजार रूपये परत केले. उर्वरित ३६ हजार रूपये देत नाही, जे करायचे आहे ते कर, असे धमकावल्याचा, आरोप सदर महिलेने पोलीस अधीक्षकांना पाठविलेल्या निवेदनात केला आहे. याची प्रत आष्टी पोलिसांना दिली आहे. याप्रकरणातील कारर्वाकडे लक्ष लागले आहे.(प्रतिनिधी)