शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
3
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
4
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
5
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
6
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
7
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
8
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
9
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
10
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
11
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
12
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
13
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
14
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
15
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
16
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
17
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
18
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
19
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
20
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...

सर्वांसाठी एक कायदा या धोरणाने वाटचाल

By admin | Updated: August 21, 2016 00:32 IST

कलम ३७० अन्वये जम्मू-काश्मिरला विशेष दर्जा प्राप्त झाल्याने येथे दुसरा कोणीही कायम निवासी बनू शकत नाही.

चिपळूण : काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष व राणे समर्थक संदीप सावंत यांनी शनिवारी मुंबई येथे मातोश्री येथे शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भगवा झेंडा खांद्यावर देत त्यांच्या हातात शिवबंध बांधले. यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख विजय कदम, खासदार विनायक राऊत, आमदार सदानंद चव्हाण, रत्नागिरीचे आमदार उदय सामंत जिल्हाप्रमुख सचिन कदम, जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम उपस्थित होते. सावंत यांच्याबरोबर काँग्रेसचे माजी नगरसेवक बाळ पड्याळ, काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते व माजी सरपंच प्रभाकर जाधव, कौंढरताम्हाणे ग्रामपंचायतीचे सरपंच चंदन भोबस्कर, उपसरपंच महेंद्र तावडे व सर्व सदस्य, तसेच प्रभाकर जाधव, श्रीकांत पवार, प्रवीण सावंत, एकनाथ माळी, संजिवनी शिंदे, राजेंद्र खेतले, प्रवीण खेडेकर, सुयोग सुर्वे, शिवराम कांबळे, दिलीप आदवडे, विशाल नरळकर, जयश्री पालांडे, रामचंद्र पंडव, महेंद्र तावडे, मनसेचे प्रमोद सकपाळ, सुनील सुर्वे, दीपक खेडेकर, राजेंद्र जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे कैलास चव्हाण, मंगेश चव्हाण, प्रदीप राजेशिर्के, विलास शिंदे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनीही मोठ्या संख्येने शिवसेनेत प्रवेश केला. या सर्वांचे स्वागत करून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. शनिवारी दुपारी १ वाजता छोटेखानी पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. प्रमुख पदाधिकाऱ्यांना शिवबंधन बांधून तर काही कार्यकर्त्यांच्या हातात भगवे झेंडे देऊन शिवसेनेत स्वागत करण्यात आले. यावेळी ठाकरे म्हणाले की, ज्या विश्वासाने तुम्ही शिवसेनेत आला आहात तो विश्वास कायम जपला जाईल. तुमचा मान सन्मान राखला जाईल. तुम्ही जोमाने काम करून संघटना वाढवा. संघटना मजबूत करण्याचा ध्यास बाळगून काम करा, असे सांगितले. (प्रतिनिधी)चौकट ग्रामपंचायत शिवसेनेकडेकौंढर ताम्हाणे ग्रामपंचायत माजी सरपंच प्रभाकर जाधव यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे. शनिवारी जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने येथील सरपंच चंदन भोबस्कर, उपसरपंच महेंद्र तावडे व सर्व सदस्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने काँग्रेसकडे असलेली ही ग्रामपंचायत आता शिवसेनेकडे गेली आहे. गुहागर विधानसभा मतदारसंघातील २५० पेक्षा जास्त कार्यकर्ते शिवसेनेत गेल्याने या मतदारसंघात शिवसेनेची ताकद वाढली आहे. राणेंविरुद्धच्या तक्रारीमुळे चर्चेतमाजी खासदार नीलेश राणे यांनी आपल्याला मारहाण केली असल्याची तक्रार संदीप सावंत यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात केली आहे. त्यामुळे राणे व त्यांच्या सहकाऱ्यांना अटक झाली होती. त्यामुळे सावंत चर्चेत आले. यानंतर सावंत यांनी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. परंतु, शनिवारी त्यांनी सहकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश केला.मुंबईत मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचे चिपळूण माजी तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांना शिवबंध बांधून स्वागत केले. यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख विजय कदम, खासदार विनायक राऊत, जिल्हाप्रमुख सचिन कदम, जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, आदी उपस्थित होते.