शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

जगातील सर्वात मोठा चरखा सेवाग्राममध्ये दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 14:55 IST

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या सुवर्ण जयंती वर्षारंभमहोत्सवात येथे उभारण्यात आलेल्या नव्या सभागृहासमोर जगातील सर्वात मोठा चरखा लोकांना पाहायला मिळणार आहे.

ठळक मुद्देनव्या सभागृहासमोर करणार स्थापना

लोकमत न्यूज नेटवर्क

 दिलीप चव्हाण वर्धा: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या सुवर्ण जयंती वर्षारंभमहोत्सवात येथे उभारण्यात आलेल्या नव्या सभागृहासमोर जगातील सर्वात मोठा चरखा लोकांना पाहायला मिळणार आहे.सेवाग्राम विकास आराखड्यात सेवाग्राम वर्धा मार्गावर सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्या जागेवर सभागृहाचे काम जलद गतीने सुरू आहे. २०१९ मध्ये १५० वी जयंती आहे. त्यामुळे सुवर्ण जयंती महोत्सवी वर्ष साजरे होणार आहे.सभागृहाच्या दर्शनी भागावर हा चरखा बसविण्यात आला असून तो जनतेला गांधी जयंतीला पाहायला मिळणार आहे. हा चरखा मुंबईतील जे.जे.स्कूल आॅफ आर्ट महाविद्यालयातील प्रा.श्रीकांत खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेला आहे. ते धातू काम विभागात कार्यरत असून या कामात त्यांना रंग व रेखा काम विभागाचे प्रा. विजय सपकाळ व प्रा. विजय बोंदर यासह बारा विधार्थ्यांनी सहकार्य केले.प्रा. श्रीकांत खैरनार लोकमत प्रतिनिधीसोबत चर्चा करताना म्हणाले, शासनाने चरख्याच्या निर्मितीची जबाबदारी सोपवली. मोठा चरखा बनवायचा हा विचार होता. दिल्लीच्या विमानतळावरील चरख्यापेक्षा मोठा असावा ही कल्पना मनात ठेवून काम सुरू केले. हा चरखा एम.एस. मध्ये बनविला. त्यामुळे दीर्घ काळ टिकणार आहे. हा १८.६ फूट उंचीचा असून त्याचे वजन ५ टन आहे. चरखा मोटरने सतत फिरत राहणार आहे. फक्त यात सूत कताई होणार नाही. एल.ए.डी. लाईटचा परिणाम साधला असून संगीत आणि भजन पण सुरू राहणार आहेत. हा चरखा बनवण्यासाठी वीस दिवसांचा कालावधी लागला. या कामात अनेक अडचणी आल्या पण सर्वांच्या सहकार्याने हे काम यशस्वी केल्याचे खैरनार पुढे म्हणाले. या चरख्यासाठी लिम्का बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डकडे संपर्क साधणार असून वर्ध्याचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याची माहिती त्यांनी पुढे दिली.गांधीजींचा हा चरखा सर्वांना प्रेरणादायी ठरो व त्यांच्या कार्य आणि विचारांचे सतत स्मरण रहावे. हा चरखा जगभरात विख्यात होईल असा विश्वास वाटत असल्याचे ते पुढे म्हणाले.

टॅग्स :Sewagramसेवाग्रामMahatma Gandhiमहात्मा गांधी