शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

भूदानातील जमिनी श्रीमंत व बिल्डरांच्या घशात

By admin | Updated: April 13, 2017 01:34 IST

आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळीमध्ये जी शेतजमीन मिळविली, त्यातील काही जमिनी गरजूंना वाटण्यात आल्या;

रामदास तडस : भूदान शेतजमिनीतील घोटाळ्याचा प्रश्न लोकसभेत वर्धा : आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळीमध्ये जी शेतजमीन मिळविली, त्यातील काही जमिनी गरजूंना वाटण्यात आल्या; पण शेती करण्याचे भान त्यापैकी अनेकांना नसल्याने त्या तशाच पडून होत्या. त्या जमिनी अधिकारी व भूमाफीयाच्या संगणमताने श्रीमंत व बिल्डरांना विकल्या गेल्यात. भूदानातील जमिनी देशातील भूमिहिन गोरगरीबांना मिळाव्या म्हणून भ्रष्टाचाराची चौकशी करावी, या मागणीकडे खा. रामदास तडस यांनी लोकसभेत नियम ३७७ अंतर्गत प्रश्न विचारून लक्ष वेधले. देशातील गोरगरीब आणि शेतमजुरांना पोटाची खळगी भरण्यासाठी जमिनीचा तुकडा असावा. तसेच अनेक श्रीमंत लोकांकडे पडून असलेली जमिनी कष्टकऱ्यांना मिळावी, भूमिहिनांना शेतीसाठी जमीन उपलब्ध करण्यासाठी आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळ राबविली. या चळवळीत मोठी जमीन असणाऱ्या जमीनदारांना जमिनीचे दान करण्याचे आवाहन करण्यात आले होते. देशातील गोरगरीब जनतेकरिता आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळ १९५१ पासून प्रारंभ केली. या चळवळीत देशातील लोकांनी २२ लाख ९० हजार एकर जमीन दान केली. पैकी १६ लाख ६६ हजार एकर जमीन देशातील भूमिहिनान्ाां वाटली; पण उर्वरित ६ लाख ३७ हेक्टर जमीन शिल्लक आहे. महाराष्ट्रात १ लाख ४ हजार हेक्टर जमीन आहे. त्यातील ०.२७ हेक्टर जमिनीचे वितरण झाले असून ७७ हजार हेक्टर जमिनीचे वाटप व्हायचे आहे. भूदानताील जमीन वाटपामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे, याकडेही खा. तडस यांनी लक्ष वेधले. आचार्य विनोबा भावे यांची भूदान चळवळ ही भूमिहिन गोरगरीब जनतेलाच जमीन मिळावी म्हणून होती; पण अलिकडच्या काळात अनेक मोठे घोटाळे बाहेर येऊ लागले. याबाबत खा. तडस यांनी लोकसभेत १८ डिसेंबर २०१४ ला अतारांकित प्रश्न व ५ मार्च २०१५ रोजी अतारांकित प्रश्न उपस्थित केला होता. आज नियम ३७७ अंतर्गत प्रश्न उपस्थित करून संसदेचे लक्ष वेधले. वर्धा जिल्ह्यात भूदानची १९८० हेक्टर जमीन असून ११८ हेक्टरचे अद्याप वाटप झाले नाही. अलिकडच्या काळात गरीबांना न देता त्या जमिनी धनदांडग्यांना वितरित झाल्या आहे. त्यावर कुणी अतिक्रमण केले तर कुठे भूखंड पाडल्याची प्रकरणे उजेडात येत आहे, याकडेही खा. तडस यांनी लक्ष वेधले.(जिल्हा प्रतिनिधी)