शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

अस्वलाच्या दहशतीने माणिकवाडावासी शेताकडे फिरकलेच नाही

By admin | Updated: July 27, 2016 00:02 IST

तालुक्यातील जंगलाने वेढलेले ३ हजार ५०० लोकवस्तीचे गाव माणिकवाडा. गावलगत असलेल्या जंगलात वाघासह अस्वलाचे वास्तव्याची गावकऱ्यांना माहिती आहे.

वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडून शोध सुरू: दोन पिलांसह अस्वलाचा बुधलागड परिसरात धुमाकुळ अमोल सोटे आष्टी (शहीद) तालुक्यातील जंगलाने वेढलेले ३ हजार ५०० लोकवस्तीचे गाव माणिकवाडा. गावलगत असलेल्या जंगलात वाघासह अस्वलाचे वास्तव्याची गावकऱ्यांना माहिती आहे. तरीही हिंमतीने जंगलव्याप्त भागात असलेल्या शेतीत ते कामे करीत आहेत. अशातच जंगलात जनावरे चारण्याकरिता गेलेल्या एका गुराख्यावर अस्वलासह तिच्या पिलाने हल्ला चढविला. या हल्ल्यात गुराख्याच्या शरीरावरील जखमा पाहून गावकरी धास्तावले असून ती भीती त्यांच्या चेहऱ्यावर झळकत आहे. माणिकवाडा गावातील गुराखी पद्माकर डाखोळे याच्यावर अस्वलासह तिच्या दोन्ही पिलांनी जोरदार हल्ला केल्याने पद्माकर मृत्यूच्या दारात उभा आहे. शेतामध्ये ठाण मांडून बसलेली अस्वल जंगलातून जाते तोच लगेच शेतात परत येते, वनविभागाचे कर्मचारी दिवसभर तिचा शोध घेत आहे; मात्र त्यांच्या हाती अद्याप काहीच लागले नाही. यामुळे या अस्वलाची दहशत गावात पसरली असून वनविभागाने याकडे लक्ष देत मार्ग काढण्याची मागणी होत आहे. माणिकवाडा या जंगलव्याप्त गावात जंगली प्राण्यांची नेहमीच ये-जा असते. याची माहिती असताना केवळ वेळ चुकल्याने पद्माकरच्या जीवावर बेतले. तो नेहमीप्रमाणे गुरे घेवून बुधलागड टेकडीच्या मागील परिसरात गेल्या. सूर्यास्ताच्या समयी आपली गुरे घेवून तो घराकडे निघाला. एवढ्यात मागाहून येत अस्वलाने झडप घातली. हिमतीने पक्का असलेला पद्माकर प्रतिकार करू लागला; मात्र तिच्या दोन पिलांनी अक्षरश: पद्माकरचा चेहरा ओरबडून टाकला. पाठीच्या अवयवाचे लचके तोडले. क्षणार्धात सगळ्या घडामोडी झाल्या. आजूबाजूला कोणीच नसल्याने त्याच किंचाळ्यांचा आवाज कानी पडला नाही. एवढा मोठा हल्ला होवूनही पद्माकरने गावातील एकाला फोन करून सगळी माहिती दिली. तेव्हा सर्व शेतकऱ्यांनी मिळून जंगलाकडे धाव घेतली. गंभीर अवस्थेत त्याला घरी आणले. याची माहिती पूर्ण गावकऱ्यांना झाल्यावर त्याला पाहण्यासाठी गर्दी झाली होती. या घटनेला आज चार दिवसांचा कालावधी होत असला तरी त्याची भीती गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर बघायला मिळत आहे. ज्या भागात घटना घडली त्या भागातील एकही शेतकरी त्या जंगलाच्या दिशेने फिरकला नाही. शिवाय गावात अस्वल येणार तर नाही ना, या चिंतेने गावकरी भयग्रस्त आहेत. ३ हजार ५०० लोकवस्ती असलेल्या गावात अस्वलाने भीती निर्माण केल्याने वनविभागाच्या मागे रक्षण व पहारा करण्याचे काम लागले आहे. १५ जणांची चमू सतत बंदोबस्तावर तैनात आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी एस.जी. परिहार नागपूरला पद्माकरच्या शस्त्रक्रियेसाठी दवाखाण्यात आहे. त्याचा पूर्ण वैद्यकीय खर्च वनविभाग करणार असून त्याच्या कुटुंबाला शासकीय मदत मिळावी याकरिता वरिष्ठांकडे प्रकरणाचा अहवाल पाठविल्याचे वनविभागाच्यावतीने सांगितले आहे.