शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

करारनाम्यावरच रखडली भूसंपादन प्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 22:20 IST

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाकरिता जमीन संपादनाचा करारनामा करण्यात आला; मात्र चार महिने लोटूनही मौजा पिपरी (मेघे), पांढरकवडा येथील शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी शेती पडितच ठेवली.

ठळक मुद्देशेतीही पडित । न्याय न मिळाल्यास बेमुदत उपोषणाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाकरिता जमीन संपादनाचा करारनामा करण्यात आला; मात्र चार महिने लोटूनही मौजा पिपरी (मेघे), पांढरकवडा येथील शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी शेती पडितच ठेवली. अन्यायग्रस्त शेतकºयांनी मोबदला तातडीने देण्याची मागणी केली असून अन्यथा बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे.नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग इंटरचेंजसाठी लागणाऱ्या जमिनीकरिता १८ जानेवारी २०१९ ला सूचना प्रसिद्ध करण्यात आली. यानंतर भूसंपादनाची घोषणा करण्यात आली. पिपरी (मेघे), पांढरकवडा येथील ८७ शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्याबाबत जाहीर सूचना देण्यात आली. शेतकºयांनी भूमापनाकरिता संमती दिल्यानंतर मोजणी झाली. या प्रक्रियेअंतर्गत उपविभागीय अधिकारी, वर्धा यांच्याकडे आक्षेप मागविण्यात आले होते. भूसंपादनाकरिता दाव्याची रक्कम व तपशील अर्ज करण्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांना उपस्थित राहण्यास सांगण्यात आले. एमएसआरडीसीतर्फे १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर जमीन संपादनाचा करारनामा करण्यात आला. मोबदल्याच्या रकमेविषयी शेतकºयांना अवगत करण्यासोबतच पैसे आठ दिवसांत जमा होतील, शेती करू नका असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. यातील अनेक शेतकऱ्यांनी जमीन घेण्याकरिता दुसरीकडे पैसे देऊन करारनामा केला. महिनाभरानंतर शेतकरी विचारणा करण्यास गेले असता डिझाईन चेंज झाल्याचे कारण पुढे करण्यात आले. या दरम्यान समृद्धी महामार्गाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत करारनामे झालेल्या शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नसल्याबाबत ठामपणे सांगण्यात आले. मात्र चार महिन्यांचा कालावधी लोटूनसुद्धा शेतकऱ्यांना मोबदला मिळालेला नाही. दुसरीकडे शेती पडीत ठेवल्याने नुकसान झाले. करार केलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा; अन्यथा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा पिपरी, पांढरकवडा येथील शेतकऱ्यांनी दिला आहे.