शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

एक्स्प्रेस हायवेसाठी भूसंपादन नव्हे भूसंचयन होणार

By admin | Updated: August 20, 2016 02:05 IST

मुंबई-नागपूर या द्रुतगती मार्गांना जोडणारा व महाराष्ट्रातील २४ जिल्ह्यांशी थेट संपर्कात येणारा एक्स्प्रेस हायवे आर्वी तालुक्यातील काही गावांतून जाणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचा शेतकऱ्यांशी संवाद : ५२ हजार हेक्टर शेती प्रकल्पात जाण्याचा अंदाज आर्वी : मुंबई-नागपूर या द्रुतगती मार्गांना जोडणारा व महाराष्ट्रातील २४ जिल्ह्यांशी थेट संपर्कात येणारा एक्स्प्रेस हायवे आर्वी तालुक्यातील काही गावांतून जाणार आहे. या प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनीचे भूसंपादन नाही तर भूसंचयन करण्यात येणार आहे. तसेच या प्रकल्पात शेतकरी हे भागीदारी स्वरूपात सहभागी राहणार आहे. शेती उद्योगाशी संबंधीत उद्योग, इतर सोईसुविधा शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली. आर्वीतील पंचायत समिती सभागृहात या प्रकल्पाबाबत शेतकऱ्यांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी बोलत होते. या नव्या प्रकल्पामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जातील त्या आर्वी तालुक्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रूपये व यावर दरवर्षी १० टक्के वाढ देण्यात येणार आहे. प्रकल्पात शेतकऱ्यांची जेवढी जमीन जाईल तेवढा मोबदला शेतकऱ्यांना देण्यात येईल. हा एक्स्प्रेस हायवे मुंबई-नागपूर सह राज्यातील २४ जिल्ह्यांना थेट जोडण्यात येणार आहे. या प्रकल्पात शेती गेलेल्या शेतकऱ्यांसाठी याच परिसरात शेती पुरक उद्योग, रोजगाराची नवी साधने व इतर सोईसुविधा देण्यात येणार आहे. या प्रकल्पाशेजारी नवीन शहर बसवून तेथे बहुसंख्य शेतकरी सांगेल तो उद्योग, शाळा, रोजगाराची साधने व शेतकऱ्यांच्या मालाला थेट बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची सुविधा राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवाल यांनी यावेळी दिली. उद्योगासाठी शेतकऱ्यांना बँकांची लोन सुविधा देण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी विरूळ गाव परिसरातील जिरायती क्षेत्राची जमीन लागणार आहे. या प्रकल्पात ज्या शेतकऱ्यांची १०० टक्के शेती जाईल त्या शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे. बाजार भावाप्रमाणे शेतकऱ्यांना शेतजमिनीचा मोबदला उपलब्ध करून देणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. या भागात कृषी समृद्धी प्रकल्प इतर उद्योग तसेच बाधीत गावातील शेतकरी म्हणतील तोच उद्योग आणल्या जाईल. शेतकऱ्यांच्या मताला प्राधान्य देण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. या प्रकल्पातून शेतकऱ्यांना वेगवान बाजारपेठ उपलब्ध करून शेतकरी आपला उत्पादित माल त्वरीत इतर बाजारपेठेत नेवून विकू शकणार आहे. या प्रकल्पात शेतकऱ्यांची अधिक भागीदारी राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवाल यांनी दिली. तालुक्यातील ५२ हजार एकर शेती या प्रकल्पात जाणार असल्याचेही सांगण्यात आले. यावेळी आमदार अमर काळे, निवासी उपजिल्हाधिकारी नावडकर, तहसीलदार राम पवार, एमएमआयडीचे अधिकारी व तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्यने उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)