शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेच्या दोन प्रकल्पांसाठी २९ गावात भूसंपादन पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 22:45 IST

वर्धा-नांदेड या नवीन रेल्वे मार्गासाठी वर्धा जिल्ह्यातील एकूण २६ गावात तर वर्धा-बल्लारशाह या तिसऱ्या रेल्वे लाईनसाठी नऊ गावांपैकी तीन गावात भुसंपादनाचे काम पूर्ण झाले आहे. वर्धा-बल्लारशाह या तिसºया रेल्वे मार्गासाठी उर्वरित सहा गावांमध्ये झटपट भूसंपादनाचे काम पूर्ण व्हावे, यासाठी जिल्हा प्रशासनाच्या भूसंपादन विभागाकडून वेळोवेळी आढावा घेतल्या जात आहे.

ठळक मुद्देशुभवार्ता : वर्धा-यवतमाळ-नांदेड प्रकल्पाला गती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा-नांदेड या नवीन रेल्वे मार्गासाठी वर्धा जिल्ह्यातील एकूण २६ गावात तर वर्धा-बल्लारशाह या तिसऱ्या रेल्वे लाईनसाठी नऊ गावांपैकी तीन गावात भुसंपादनाचे काम पूर्ण झाले आहे. वर्धा-बल्लारशाह या तिसºया रेल्वे मार्गासाठी उर्वरित सहा गावांमध्ये झटपट भूसंपादनाचे काम पूर्ण व्हावे, यासाठी जिल्हा प्रशासनाच्या भूसंपादन विभागाकडून वेळोवेळी आढावा घेतल्या जात आहे.वर्धा-नांदेड हा नवीन रेल्वे मार्ग नागरिकांसाठी फायद्याचा ठरणारा असल्याने या प्रकल्पाकडे संपूर्ण महाराष्ट्राचेच लक्ष लागले आहे. त्याबाबतची घोषणा झाल्यानंतर भुसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करीत सदर जमीन रेल्वे विभागाला हस्तांतरीत होत प्रत्यक्ष कामाला कशी लवकरात लवकर सुरूवात करता येईल यासाठी वर्धा जिल्हा प्रशासनाच्या भुसंपादन विभागाने युद्धपातळीवर काम सुरू केले. अल्पावधीतच या विभागाने संपूर्ण २६ गावातील जमीन संपादनाची प्रक्रिया पूर्ण केल्याने त्यांच्या या प्रयत्नांना बºयापैकी यश आल्याचे दिसून येत आहे. तर वर्धा-बल्लारशाह या तिसºया रेल्वे लाईनसाठी वर्धा जिल्ह्यात एकूण नऊ गावातील जमीन संपादीत करणे क्रमप्राप्त आहे. त्यापैकी तीन गावातील जमीन संपादीत करण्यात आली आहे. शिवाय उर्वरित सहा गावातील जमीन संपादन करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न होत आहेत. सोमवारी रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत जिल्हा प्रशासनातील भुसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी चंद्रभान पराते यांनी बैठक घेवून चर्चा केली. शिवाय काही भूसंपादनाचे प्रकरणांवर सकारात्मक चर्चेअंती तोडगा काढण्यात आल्याचे सांगण्यात आले.वर्धा-नागपूर तिसऱ्या व चौथ्या रेल्वे लाईनची प्रक्रिया मोजणीस्तरावरवर्धा-नागपूर या तिसऱ्या व चौथ्या रेल्वे लाईनसाठी वर्धा जिल्ह्यातील एकूण दहा गावांमध्ये जमिनीचे संपादन करण्यात येणार आहे. सध्या सदर प्रकल्पाचा विषय मोजणी स्तरावर आहे. लवकरच मोजणी पूर्ण करून जमिनीचे संपादन करीत ही दहा गावांमधील जमीन रेल्वे विभागाला हस्तांतरीत केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.तीन महिन्यांत होईल संपादनाची प्रक्रिया पूर्णरेल्वे मार्गासाठी लागणाऱ्या जमिनीची मोजणी व संपादनाची प्रक्रिया पूर्ण करून ही जमीन रेल्वे विभागाकडे हस्तांतरीत केली जाणार आहे. राज्य शासन ही जमीन रेल्वे विभागाला हस्तांतरीत करणार असून ही संपूर्ण प्रक्रिया येत्या तीन महिन्यांमध्ये पूर्ण केली जाईल, असे सांगण्यात आले.अडचणींवर मात करण्याच्या सूचनासदर चारही प्रकल्पांसाठी लागणारी जमीन संपादित करण्यासंदर्भात येणाºया अडचणी तत्काळ दूर कराव्या, अशा सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. रेल्वे विभाग व जलसंपदा विभागाच्या बैठकीत या सूचना मोजणी विभागाला देण्यात आल्या असल्याचे सांगण्यात आले.वर्धा-नांदेड या नव्या रेल्वे लाईनसाठी २६ गावांमध्ये भूसंपादन करण्यात आले आहे. वर्धा-बल्लारशाह या तिसऱ्या रेल्वे लाईनसाठी आतापर्यंत तीन गावातील जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. तर वर्धा-नागपूर या तिसऱ्या व चौथ्या रेल्वे लाईनसाठी लागणाऱ्या जमिनीच्या भूसंपादनाची प्रक्रिया मोजणी स्तरावर आहे. यद्धपातळीवर हे काम होत आहे.- चंद्रभान पराते, उपजिल्हाधिकारी, भुसंपादन, वर्धा.