शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रमौळी झोपडीत ‘समर्पणा’तून उजळला ज्ञानाचा दिवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 05:00 IST

समर्पण झोपडीवजा घरात राहतो. टिनाचे छप्पर, भिंत म्हणून लावलेले पॉलिथिन, अतिशय तोकडी जागा असलेले घर, अभ्यास करायची स्वतंत्र व्यवस्था नाही, स्टडीरूम, हॉल, किचन, बेडरूम सर्वकाही एकत्रच. अशाही परिस्थितीमध्ये समर्पणने सतत अभ्यासाचा ध्यास घेत दहावीच्या परीक्षेमध्ये गणितामध्ये १०० पैकी १०० तर विज्ञान विषयांमध्ये शंभरपैकी ९९ गुण मिळवले. ९४.४ टक्के गुण घेऊन त्याने गांधी विद्यालयातून प्रथम क्रमांक मिळवला.

ठळक मुद्देपरिस्थितीवर मात करीत मिळविले ९४.४ टक्के : पालिकेच्या शाळेतून घेतली भरारी

लोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाडा/आर्वी : नगर परिषद संचालित गांधी विद्यालयातील इयत्ता दहावीचा विद्यार्थी जनतानगरातील रहिवासी समर्पण शारदा राजू वैद्य याने अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून विद्यालयाच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला आहे.समर्पण झोपडीवजा घरात राहतो. टिनाचे छप्पर, भिंत म्हणून लावलेले पॉलिथिन, अतिशय तोकडी जागा असलेले घर, अभ्यास करायची स्वतंत्र व्यवस्था नाही, स्टडीरूम, हॉल, किचन, बेडरूम सर्वकाही एकत्रच. अशाही परिस्थितीमध्ये समर्पणने सतत अभ्यासाचा ध्यास घेत दहावीच्या परीक्षेमध्ये गणितामध्ये १०० पैकी १०० तर विज्ञान विषयांमध्ये शंभरपैकी ९९ गुण मिळवले. ९४.४ टक्के गुण घेऊन त्याने गांधी विद्यालयातून प्रथम क्रमांक मिळवला. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची.वडिलांचा कुठलाही आधार नाही. आई आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने तो शिकत राहिला. अभ्यास करीत राहिला. शाळेतील मित्र, शिक्षक मदत करायचे. भविष्यामध्ये सीएच व्हायचं ही खूणगाठ त्याने मनाशी बांधली आणि ती पूर्णत्वास जाण्याच्या दिशेने त्याने पहिले पाऊल टाकले आहे.नगर परिषदेचे मुख्याधिकारी विद्याधर अंधारे, नगराध्यक्ष प्रशांत भाऊ सव्वालाखे, शिक्षक संजय किटे, स्मिता बिजवे, नावेद गणी, एनसीसी अधिकारी प्रमोद नागरे, प्राचार्य उषा नागपुरे यांनी त्याचे कौतुक केले. नगराध्यक्ष, मुख्याधिकारी शिक्षकांनी त्याला रोख स्वरूपात बक्षीस दिले.विद्याविनयेन शोभतेपरिस्थिती यशाच्या मार्गात येऊ शकत नाही, याचे अत्यंत सुंदर उदाहरण म्हणजे समर्पण. समर्पण हा जेवढा हुशार आहे तेवढाच तो नम्र स्वभावाचा आहे. म्हणूनच विद्याविनयेन शोभते, ज्ञानाबरोबरच आपल्यामध्ये असायला पाहिजे, हे त्याने दाखवून दिले आहे. इतरांनी सुद्धा त्याला भेट द्यायला पाहिजे.

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकाल