शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्षपदासाठी लाखोंची उलाढाल होणार

By admin | Updated: July 20, 2014 00:04 IST

जिल्ह्यातील सहापैकी देवळी पालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी शोभा तडस यांची एकमेव दावेदारी असल्यामुळे त्यांची निवड निश्चित मानली जात आहे. घोषणेची औपचारिकता तेवढी शिल्लक आहे.

२२ ला निवडणूक : अनेकांनी बांधले बाशिंग वर्धा : जिल्ह्यातील सहापैकी देवळी पालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी शोभा तडस यांची एकमेव दावेदारी असल्यामुळे त्यांची निवड निश्चित मानली जात आहे. घोषणेची औपचारिकता तेवढी शिल्लक आहे. उर्वरित पाच पालिकांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी एकेका नगरसेवकांसाठी चांगलीच रस्सीखेच सुरू असून मोठ्या प्रमाणावर घोडा बाजार होण्याची दाट शक्यता आहे. या शर्यतीत जो अधिक भाव देईल, त्याच्याच दावणीला ते ते नगरसेवक बांधले जाईल, अशीही राजकीय गोटातील माहिती आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लाखो रुपयांची उलाढाल होण्याची शक्यता नाकारता येत आहे. वर्धा, हिंगणघाट, पुलगाव, आर्वी, देवळी, सिंदी (रेल्वे) या पालिकांच्या नगराध्यक्षाचा अडीच वर्षांचा कालावधी संपुष्टात आला. नव्या नगराध्यक्ष निवडीकरिता येत्या मंगळवार दि. २२ जुलै रोजी निवडणुका होऊ घातल्या आहे. या निवडणुकीला आता अवघे चार दिवस उरले आहे. नगराध्यक्षपदाची निवडणूक म्हणजे, नगरसेवकांसाठी पर्वणीच, असा अर्थ काढून काही नगरसेवक आपली वेगळी चूल मांडून आपले वेगळे अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र दाखवायचे दात वेगळे आणि खाण्याचे वेगळे...हे नगराध्यक्षाच्या शर्यतीत असेलल्या उमेदवारांपासून लपून राहिले नाही. त्यांचे मन वळवून मतदानासाठी प्रवृत्त करण्याची कसरत उमेदवारांसह संबंधित राजकीय पक्षांनाही करावी लागत आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात घोडाबाजार सुरू असल्याची माहिती आहे. काही पालिका क्षेत्रातील नगरसेवक सहलीचा आनंद लुटत असल्याची माहिती आहे. काहींनी दुसऱ्या उमेदवारांनी पळवू नये म्हणून भूमिगत केल्याचीही माहिती आहे. ही मंडळी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या दिवशी एकाएकी अवतरतील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. एकदा नगराध्यक्षपद मिळाले, तर त्या सोबत मानसन्मान आणि प्रतिष्ठा आपोआप चालून येईल, या अनुषंगाने उमेदवारांनीही जोरदार फिल्डींग लावली आहे. बजेट वाढला तरी गड जिंकायचा अशा बेतात, काही उमेदवार आहे. या निवडणुकीत कोण सिनिअर आणि कोण ज्युनिअर हा भेद न पाळता जो आर्थिकदृष्ट्या मजबूत तोच बाजी मारणार, असा फंडा राजकीय पक्षांकडून वापरला जात असल्याची माहिती आहे.(जिल्हा प्रतिनिधी)