शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेस्थानकावर पार्कींगचा अभाव

By admin | Updated: July 8, 2017 00:23 IST

मध्य रेल्वेच्या वर्धा स्थानकावरसमोर पार्कींगकरिता कुठेही जागा ठेवण्यात आली नाही.

वाहनधारक त्रस्त : कारवाईसाठी दिले वाहतूक विभागाला पत्र लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : मध्य रेल्वेच्या वर्धा स्थानकावरसमोर पार्कींगकरिता कुठेही जागा ठेवण्यात आली नाही. त्यामुळे प्रवाशांना सोडयला आलेले किंवा आरक्षण करण्यासाठी आलेले वाहन धारक रेल्वे पोलीस ठाण्यापुढे त्यांची वाहने उभी करतात. येथे उभ्या केलेल्या वाहनांवर वाहतूक पोलीस कारवाई करीत असल्याने वाहन धारक त्रस्त झाले आहेत. पार्कींगची सुविधा करण्याऐवजी कारवाइसाठी रेल्वे प्रशासन आमंत्रण देत असल्याचा प्रकार यातून समोर आला आहे. रेल्वेस्थानक परिसरात यापूर्वी पे अ‍ॅण्ड पार्क ची व्यवस्था होती. येथे प्रवासी वाहने उभी करत होते. ही व्यवस्था आता पेट्रोलपंपच्या मागील बाजुस करण्यात आली आहे. तसेच प्रवाशांसाठी टिकिट घराच्यामागे वाहन ठेवण्याची व्यवस्था केली. येथे जाण्याकरिता पेट्रोलपंपच्या बाजूने रस्ता केला आहे. अल्पशा कामाकरिता आलेले नागरिक तेथे वाहने ठेवत नाही. याच वाहनांवर कारवाई केली जात आहे. एक महिन्यांपूर्वी काही दुचाकींवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली होती. यावर आक्षेप घेत तत्कालीन रेल्वे पोलीस निरीक्षक नालट यांच्याकडे तक्रार करण्यात आली असता त्यांनी वाहतूक पोलिसांनी रेल्वे आवारात कारवाई करू नये, अशा सूचना वाहतूक पोलिसांना दिल्या होत्या. यामुळे वाहतूक पोलीस निरक्षक गुरव यांनी रेल्वेच्या आवारातील कारवाई बंद केली होती. परिणामी प्रवाशांना दिलासा मिळाला होता. काही दिवसांपूर्वी रेल्वे विभागीय व्यवस्थापक यांनी पाहणी केली असता रेल्वे पोलीस स्टेशनसमोर त्यांना वाहने उभी असल्याचे दिसले. यावरुन त्यांनी रेल्वे पोलिसांना धारेवर धरले. परिणामी रेल्वे पोलिस निरीक्षक डोंगरे यांनी वाहतूक पोलिसांनी पुन्हा कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत तत्सम पत्रही वाहतूक पोलिसांना देण्यात आले. यामुळे वाहनांवर पुन्हा कारवाई सुरु करण्यात आली आहे. याचा प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.