शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याच्या टाकीतून लाखो लीटर पाण्याची नासाडी

By admin | Updated: March 16, 2017 00:47 IST

पाण्याच्या जपून वापर करावा, यासाठी शासनस्तरावर जागृती मोहीम राबविण्यात येते. यावर लाखो रूपये खर्च करण्यात येत आहे.

जीवन प्राधिकरणचा गलभान कारभार : नगराध्यक्षांनी केली संबंधीत विभागाची कानउघाडणी आर्वी : पाण्याच्या जपून वापर करावा, यासाठी शासनस्तरावर जागृती मोहीम राबविण्यात येते. यावर लाखो रूपये खर्च करण्यात येत आहे. मात्र जीवन प्राधिकरण विभागाच्या गलथान कारभारामुळे येथील पाण्याच्या टाकीतून दिवसाला लाखो लीटर पाण्याच्या अपव्यय होत आहे. या संदर्भात नगराध्यक्ष प्रा. प्रशांत सव्वालाखे यांंनी संबंधीत विभागाची चांगलीच कानउघाडणी केल्याची माहिती आहे. पाण्याचा अपव्यय होत असताना याकडे जीवन प्राधिकरण विभाग लक्ष देण्यास तयार नाही. नागरिकांनी अनेकदा ही बाब लक्षात आणुन दिली. तरीही उपाययोजना केल्या जात नसल्याचे दिसून आले. दरम्यान नगराध्यक्ष प्रा. प्रशांत सव्वालाखे हे दररोज सकाळी शहराचा फेरफटका मारतात. या माध्यमातून ते नागरिकांच्या समस्या जाणुन घेतात. शहरात फेरफटका मारत असतात त्यांना जनतानगर येथे पाण्याचा अपव्यय होत असल्याचे दिसून आले. येथील पाण्याच्या टाकीतून आर्वी शहराला पुरवठा होतो. पाणी टाकी भरल्यावर पाणी पुरवठा सुरूच असतो. हा प्रकार तीन ते चार वर्षापासून सुरू असल्याचे रहिवाशांनी सांगितले. या संदर्भात नगराध्यक्ष प्रा. सव्वालाखे यांनी आर्वीतील जीवन प्राधिकरण विभागाशी संपर्क साधून ही समस्या तातडीने निकाली काढण्यासाठी चर्चा केली. तसेच चार वर्षापासून हा प्रकार सुरू असताना उपाययोजना न केल्याने कानउघाडणी केली. जनतानगराच्या येथील पाण्याच्या टाकीची १० लाख लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. टाकी भरण्याकरिता तीन तास लागतात, मात्र पाण्याची मोटर सुरुच असते. त्यामुळे उर्वरीत पाणी टाकीतून रस्त्यावर वाहते. तक्रार करुनही संबंधीत विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने पाण्याचा अपव्यय सुरू आहे. उपाययोजनांकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.(तालुका प्रतिनिधी)