शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘झेडपी’ समोर आरोग्य कर्मचाऱ्यांचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 23:32 IST

जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी सोमवारी स्थानिक जिल्हा परिषद कार्यालयासमोर एकत्र येत महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्या नेतृत्त्वा धरणे आंदोलन केले. याप्रसंगी विविध मागण्यांचे निवेदन जि.प. मुख्य कार्यपालन अधिकाºयांना सादर करण्यात आले.

ठळक मुद्देसमस्या निकाली काढण्यासाठी जि.प. मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी सोमवारी स्थानिक जिल्हा परिषद कार्यालयासमोर एकत्र येत महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्या नेतृत्त्वा धरणे आंदोलन केले. याप्रसंगी विविध मागण्यांचे निवेदन जि.प. मुख्य कार्यपालन अधिकाºयांना सादर करण्यात आले.आरोग्य पर्यवेक्षक या पदावर आरोग्य सहायक (पुरूष) व आरोग्य सहायक (महिला) या संवर्गातील पदोन्नती करावी. आरोग्य कर्मचाºयांना दुसरा व चौथा शनिवारी सुट्टी देण्याचा शासन निर्माण काढण्यात यावा. २६ जानेवारीच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात आरोग्य कर्मचाºयांचा समावेश करावा. शासन निर्णय ६ आॅगस्ट २००७ च्या आकृतीबंधानुसार मंजूर असलेली पं.स. कार्यालयातील उपकेंद्र स्तरावरील, जिल्हास्तरावरील आरोग्य सेवक, आरोग्य सहायक, आरोग्य पर्यवेक्षक या पदावर मंजूर असलेल्या पदांची बिंदुनामावली करून पदे भरण्यात यावी. लेखाशिर्ष २२११ च्या मंजुरी पदांची बिंदुनामावली करून पदे भरावे. दिव्यांग बांधवांना नियमानुसार भरती व पदोन्नती मिळण्यात यावी आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. सदर आंदोलनाचे नेतृत्त्व संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष दिलीप उटाणे, सिद्धार्थ तेलतुंबडे, दीपक कांबळे, वंदना उईके, रतन बोंडे यांनी केले. आंदोलनात सुनीता रेवडे, तारा भोंगाडे, गिता बकाने, कविता झामरे, राजेंद्र धरमठोक, अविनाश चव्हाण, अमित कोपुलवार, ममता लोखंडे, माया राऊत, आशा धुर्वे, हराळे आदी हजर होते.५ नोव्हेंबरला बैठकआंदोलनकर्त्यांचे निवेदन जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी अजय गुल्हाणे यांनी स्विकारले. यावेळी त्यांनी आरोग्य कर्मचाºयांच्या प्रलंबित मागण्याबाबत जि.प.प्रशासन गंभीर आहे. त्यांच्या समस्या निकाली काढण्यासाठी जुकाअ यांच्या कक्षात संघटना प्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाºयांनी बैठक ५ नोव्हेंबरला घेण्यात येईल असे आश्वासन याप्रसंगी जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी अजय गुल्हाणे यांनी दिले.