शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
6
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
7
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
8
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
9
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
10
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
11
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
12
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
13
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
14
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
15
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
16
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
17
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
20
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...

मोझरी गावात मूलभूत सुविधांचा अभाव

By admin | Updated: November 2, 2014 22:46 IST

गावांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे येथील नागरिकांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत लोकप्रतिनिधीं उदासीन असल्याने नागरिक वारंवार संताप व्यक्त करीत आहे.

मोझरी (शेकापूर) : गावांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे येथील नागरिकांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत लोकप्रतिनिधीं उदासीन असल्याने नागरिक वारंवार संताप व्यक्त करीत आहे. मोझरी(शेकापूर) गावाशी आजूबाजूच्या सात आठ गावांचा दररोजच्या दैनंदिन व्यवहारानिमित्त संबंध येतो़ तसेच पंचायत समिती सर्कलचे हे गाव असल्याने येथे वैद्यकीय दृष्ट्या आरोग्य केंद्र असणे आवश्यक आहे़ तरीही केवळ उपकेंद्राच्या भरवश्यावर येथील आरोग्यव्यवस्थेचा कारभार चालतो. तसेच तुटपुंज्या औषधासाठी तर अनेकदा साध्या बिमारीच्या औषधांचाही येथे तुटवडा असतो़ त्यामुळे मोझरीसह आजूबाजूच्या गावातील नागरिकांना खासगी रुग्णालयाचा रस्ता पकडावा लागतो़येथे अनेक वर्षापासून राष्ट्रीयकृत बँक शाखेची मागणी करण्यात येत आहे़ याबाबत राज्यमंत्र्यांनी आश्वासनही दिले होते़ परंतु अद्याप याबाबत कोणत्याही हालचाली दिसत नाही़ परिणामी वृद्ध नागरिकांना आर्थिक, मानसिक त्रास सहन करून बाहेरगावी जावे लागते़त्याचप्रमाणे विद्युत बिल भरणा केंद्र नसल्यामुळे अनेकांना बिलाची तारीख कधी गेली व बाहेरगावी कधी जावून बिल भरावे याची अडचण भासत आहे़ तसेच परिसरातील नागरिकांनाही अडचण निर्माण होत आहे़ त्यामुळे येथे वीज बिल भरणा केंद्र देण्याची मागणी वारंवार होत आहे़तसेच येथे केवळ एका लाईनमनच्या भरवश्यावर गावचा तसेच आजूबाजूच्या गावांचा कारभार चालतो़ सदर लाईनमन बाहेरगावावरून ये-जा करीत असल्याने रात्री बेरात्री विद्यूतपुरवठ्यात बिघाड आल्यास अंधारात रात्र काढावी लागते़ त्यामुळे येथे कमीतकमी दोन मुक्कामी पूर्णवेळ लार्ईनमन देण्यात यावे अशी मागणी होत आहे. अद्याप ती देखील पूर्णत्वास आली नाही़ येथून पाच दिशांना जाणारे रस्तेमार्ग आहेत़ त्यांचे पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून करण्यात आलेले काम हे अतिशय निकृष्ठ दर्जाचे झाल्याने रस्ते उखडले आहे. मोझरी-कापसी या ६ कि़मी मार्ग तर स्वातंत्र्यापासून अद्यापपर्यंत दुर्लक्षितच आहे़ हा मार्ग लवकर पूर्णत्वास आणल्यास राळेगाव देवळी पुलगाव कमी वेळात गाठणे शक्य होणार आहे. बँक, विद्युत बिल भरणा केंद्र, आरोग्य केंद्र लाईनमन, रस्ते, आदी चांगल्या प्रकार उपलब्ध करण्याची मागणी वारंवार होत आहे़(वार्ताहर)