शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

शेतीच्या मशागतीला मजूरच मिळेना

By admin | Updated: June 21, 2014 02:01 IST

गतवर्षी शेतकऱ्यांनी निसर्गाच्या प्रकोपाचा सामना केला. मात्र यंदा वर्षाच्या सुरूवातीला अनियमित पाऊस ...

सेलू : गतवर्षी शेतकऱ्यांनी निसर्गाच्या प्रकोपाचा सामना केला. मात्र यंदा वर्षाच्या सुरूवातीला अनियमित पाऊस आणि प्रलंबित पावसामुळे शेतकरी त्रस्त आहे. यातच मजुरीचे दर वाढल्याने शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. याशिवाय मजूर मिळत नसल्याने मशगतीचे कामे खोळंबली आहे.मागील हंगाम पिकांकरिता प्रतिकुल असल्याने शेतकऱ्याच्या अपेक्षा रब्बी हंगामावर होत्या. परंतु, रब्बी हंगामातील पीक बरहल्यावर नेमकी गारपीट झाली. तोंडाचा घास हिरावला. पुन्हा एकदा नव्या उमेदीने शेतकरी खरिपाच्या मशागतीला लागला. मात्र मजूरच्या मिळत नसल्याने आगामी शेतीची कामे कशी करावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.मजूरीचे दर वाढल्याने किंबहुना ती रक्कमही शेतकऱ्यांजवळ उपलब्ध नाही. त्यामुळे घरातील सर्व मुलाबाळासह आपल्या शेतीवर सकाळपासून शेतकरी राबताना दिसून येत आहे. मजुरांच्या मजूरीच्या दरात सध्या मोठी वाढ झाली आहे. १५० ते ३०० रूपये मजूरीचा दर आहे. यामुळे शेकतकरी त्रस्त आहे. वाढलेली मजूरी देऊनही मजूर मिळतीलच याची खात्री नाही. परिणामी, सध्या खरीपाच्या लागवडीसाठी सुरू असलेल्या शेती मशागतीच्या कामावर परिणाम होत आहे. आधीच विविध नैसर्गिक प्रकोपामुळे शेतकऱ्यांच्या हातात काहीच आले नसताना खरीपाची तयारी कशी करावी हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.शासनाच्या अंत्योदय व दारिद्रयरेषेखालील घटकांसाठीच्या स्वस्त धान्य योजनेमुळे एका कुटुंबाला महिन्यासाठी ३५ ते ४४ किलो धान्य स्वस्तात मिळत आहे. अतिशय कमी किमतीत धान्य मिळत असल्याने मजूरांनी धान्यासाठी मजुरीच करणे सोडून दिले. परिणामी उत्पन्न कमी व खर्च अधिक झाल्याने शेतकऱ्यांनी गहू व इतर कडधान्यांचा पेरा कमी केला. त्याऐवजी सोयाबीन व हरभऱ्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. ही दोन्ही पिके अल्प कालावधीत येतात आणि इतर पिकाच्या तुलनेत कमी मजूर लागतात. निंदणाला पर्याय म्हणून तणनाशकाचा वापर करीत आहे. मात्र याच्या अतिरेकी वापरचा परिणाम थेट जमिनीच्या उत्पादन क्षमतेवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. केवळ मजूर मिळत नसल्याने दुष्परिणामाची माहिती असूनही शेतकऱ्यांकडून तणनाशकाचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो. आज निर्माण झालेल्या वैरणटंचाईमागे मजुरांची समस्याच कारणीभूत आहे. ज्वारीचा पेरा कमी झाला तेव्हापासून वैरणटंचाई निर्माण झाली. गुरे चारण्यासाठी गुराखी मिळत नसल्याने गुरांची संख्या कमी झाली आहे. शेतकरी अस्मानी व सुल्तानी संकटाचा सामना करीत असल्याचे दिसून येते.(तालुका प्रतिनिधी)