शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सहा महिन्यांनंतर आर्वी तालुक्यात कोविड विषाणूचा संसर्ग ‘इन कंट्रोल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 05:00 IST

आर्वी तालुक्यातील हिवरा तांडा या गावातील एका मृत महिलेचा कोविड चाचणी अहवाल पॅाझिटिव्ह आल्याने आणि तिच्या अंत्यविधीला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती राहिल्याने आरोग्य यंत्रणेसह तालुका प्रशासनात एकच खळबळ उडाली होती. त्यावेळी खबरदारीचा उपाय म्हणून हिवरा तांडा गाव परिसरात कंटेन्मेंट झोन तयार करून सात किमीचा परिसर सील करण्यात आला होता. असे असतानाही जिल्ह्याबाहेरून आलेल्यांमुळे आर्वी तालुक्यातील ग्रामीण तसेच शहरी भागात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत गेली.

ठळक मुद्देएकेकाळी होता कोरोनाचा ‘हॉटपॅाट’ : सध्या ॲक्टिव्ह रुग्णांची संख्याही घटतेय, मागील सहा दिवसांत आढले चार रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्क देऊरवाडा/आर्वी : जिल्ह्यातील पहिला कोविड बाधित आर्वी तालुक्यातील हिवरा तांडा येथे सापडला. त्यानंतर बघता बघता आर्वी तालुका कोरोनाचा हॉटपॅाट होऊ पाहत होता. पण नंतर येथे उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांनी सक्तीची संचारबंदी लागू केली. शिवाय तालुका प्रशासनासह स्थानिक स्वराज्य संस्थांनी प्रभावी जनजागृती केल्याने सध्या आर्वी तालुक्यात कोविड-१९ या विषाणूचा संसर्ग ‘इन कंट्रोल’ आहे.आर्वी तालुक्यातील हिवरा तांडा या गावातील एका मृत महिलेचा कोविड चाचणी अहवाल पॅाझिटिव्ह आल्याने आणि तिच्या अंत्यविधीला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती राहिल्याने आरोग्य यंत्रणेसह तालुका प्रशासनात एकच खळबळ उडाली होती. त्यावेळी खबरदारीचा उपाय म्हणून हिवरा तांडा गाव परिसरात कंटेन्मेंट झोन तयार करून सात किमीचा परिसर सील करण्यात आला होता. असे असतानाही जिल्ह्याबाहेरून आलेल्यांमुळे आर्वी तालुक्यातील ग्रामीण तसेच शहरी भागात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत गेली. त्यामुळे या परिस्थितीवर नियंत्रण मिळविणे हे प्रशासनासमोर मोठे आव्हाणच होते. अशातच उपविभागीय न्याय दंडाधिकारी तथा उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांनी  आर्वी शहरात सक्तीची संचालबंदी लागू केली होती. या संचारबंदीच्या काळात विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. शिवाय कोरोना बाबात प्रभावी जनजागृती करण्यात आली. यासह करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांमुळे आर्वी तालुक्यातील कोरोनाच्या संसर्गाला ब्रेक लावण्यात प्रशासनाला यश आले आहे.  सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी कोरोनाचा धोका अजूनही कायम आहे. असे असले तरी पूर्वी ज्या भागात सर्वाधिक रुग्ण होते तेथे सध्या नाहीच्या बरोबरीनेच कोविड बाधित आहेत. विशेष म्हणजे आर्वी शहर आणि तालुक्यातील काही गावे ही दाटीवाटीची लोकवस्ती असून नागरिकांच्या सहकार्यामुळेच प्रशासनाला कोरोनाच्या संसर्गाला ब्रेक लावण्यात यश आले आहे. मागील सहा दिवसांचा विचार केल्यास तालुक्यात केवळ चार नवे कोविड बाधित सापडले.

कोरोना विषाणूच्या संसर्गाला ब्रेक लावण्यासाठी तालुक्यातील नागरिकांसह तालुका वैद्यकीय अधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच तालुका प्रशासनाचे उत्तम सहकार्य लाभले. तालुक्यात नवीन कोविड बाधित सापडण्याची गती मंदावली असली तरी अजूनही कोरोनाचा धोेका कायम आहे, हे नागरिकांनी लक्षात घेतले पाहिजे.- डॉ. आशीष सोनी, नोडल अधिकारी, आर्वी.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या