शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आता प्राथमिक आरोग्य केंद्रातही मिळणार कोविडची लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 05:00 IST

केंद्र सरकारच्या सूचनेनुसार वर्धा जिल्ह्यात तीन खासगी लसीकरण केंद्र सूरू करण्यात आले आहेत. या ठिकाणी लसीसाठी नागरिकांना २५० रुपये मोजावे लागणार आहे. बुधवार ३ मार्चपर्यंत जिल्ह्यातील १८ हजार २८६ व्यक्तींना लसीचा पहिला डोज तर ५ हजार ५९४ व्यक्तींना कोविड लसीचा दुसरा डोज देण्यात आला आहे.

ठळक मुद्देसोमवारपासून होणार प्रत्यक्ष लसीकरण : जिल्हा प्रशासनातील बड्या अधिकाऱ्यांमध्ये झाली सकारात्मक चर्चा

महेश सायखेडेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पहिल्या फळीतील कोविड योद्धानंतर अतिजोखीमेच्या व्यक्ती तसेच वयोवृद्धांना कोरोनाची लस देण्याचे शासनाने निश्चित केल्यानंतर सध्या जिल्ह्यात प्रत्यक्ष लसीकरणही केले जात आहे. लसीकरण केंद्रांवर नागरिकांची गर्दी होऊ नये या हेतूला केद्रस्थानी ठेवून जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य केंद्रांवरून आता कोरोनाची लस देण्याचे जिल्हा प्रशासनाने निश्चित केले असून त्यासाठी गुरूवारी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्या उपस्थितीत बड्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली.प्राप्त माहितीनुसार, केंद्र सरकारच्या सूचनेनुसार वर्धा जिल्ह्यात तीन खासगी लसीकरण केंद्र सूरू करण्यात आले आहेत. या ठिकाणी लसीसाठी नागरिकांना २५० रुपये मोजावे लागणार आहे. बुधवार ३ मार्चपर्यंत जिल्ह्यातील १८ हजार २८६ व्यक्तींना लसीचा पहिला डोज तर ५ हजार ५९४ व्यक्तींना कोविड लसीचा दुसरा डोज देण्यात आला आहे. जेष्ठ नागरिकांसह अतिजोखमीच्या गटात येणाऱ्या नागरिकांना त्यांच्या गावातच कोविडची लस मिळावी तसेच तालुक्यांच्या तसेच शहरांच्या स्थळी असलेल्या लसीकरण केंद्रांवर लस घेणाऱ्यांची गर्दी होऊ नये या हेतूने जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य केंद्रातच नागरिकांना कोरोनाची लस नि:शुल्क देण्याचे निश्चित केले आहे. असे असले तरी सोमवारपासून प्रत्यक्ष लसीकरणाला सुरूवात होणार आहे. वर्धा जिल्ह्याला आतापर्यंत कोविशिल्डचे ५४ हजार १०० तर कोव्हॅक्सिनचे १७ हजार ४०० डोज प्राप्त झाले आहेत. हिच लस नागरिकांना दिली जाणार आहे.

लससाठा मुबलकचवर्धा जिल्ह्याला आतापर्यंत ५४ हजार १०० कोविशिल्ड तर १७ हजार ४०० कोव्हॅक्सिनचे डोज मिळाले आहे. त्यापैकी १८ हजार २८६ व्यक्तींना लसीचा पहिला तर ५ हजार ५९४ व्यक्तींना लसीचा दुसरा डोज देण्यात आला आहे. जिल्ह्यात सध्या मुबलक प्रमाणात कोरोनाची लस असून जिल्ह्यातील २८ प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील १२ एमबीबीएस तर १६ बीएएमएस डॉक्टर तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने गावपातळीवर आता लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे.

शासनाच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेवून जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य केंद्रावरून नागरिकांना कोरोनाची लस कशी देता येईल यावर गुरूवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत सकारात्मक चर्चा झाली. त्यादिशेने प्रत्यक्ष काम करण्यासाठी प्रयत्न होत आहे. प्रशिक्षण दिल्यानंतर सोमवारी बहूतांश प्राथमिक आरोग्य केंद्रांवरून प्रत्यक्ष लसीकरणाला सुरूवात होणार आहे.- डॉ. अजय डवले, जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा.

या अडथळ्यांवर करावी लागेल मात...

तळेगावची इमारत निर्माणाधीनतळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत निर्माणाधीन असून या गावात कसे लसीकरण केंद्र द्यावे, यासाठी सध्या विचार होत आहे.अंतोरात नाही इमारतअंताेरा प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत आरोग्य विभागाच्या मालकीची नसल्याने या गावात लसीकरण केंद्र कुठे द्यावे यावरही सध्या जिल्हा पातळीवरील अधिकाऱ्यांमध्ये चर्चा होत आहे.तीन प्राथमिक केंद्रात नाही इंटरनेट सुविधाजिल्ह्यात एकूण २८ प्राथमिक आरोग्य केंद्र असले तरी त्यापैकी तीन ठिकाणी इंटरनेटची सुविधा नसल्याने या केंद्रांमध्ये तातडीने इंटरनेट सुविधा उपलब्ध करीत या ठिकाणांहून प्रत्यक्ष लसीकरण कसे करता येईल यासाठी जिल्हा पातळीवरील अधिकाऱ्यांकडून प्रयत्न होत आहेत.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस