शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

कोतवाल वेतन श्रेणीपासून बेदखल

By admin | Updated: September 2, 2016 02:05 IST

शासनाच्या योजना राबविण्याकरिता व त्याची माहिती सर्वसमान्यांना देण्याकरिता शासनानेच कोतवालपद निर्माण केले.

वृद्ध कोतवालांचे बेहाल : चार वर्षांपासूनच्या मागणीकडे शासनाचे दुर्लक्षपुरुषोत्तम नागपुरे  वर्धाशासनाच्या योजना राबविण्याकरिता व त्याची माहिती सर्वसमान्यांना देण्याकरिता शासनानेच कोतवालपद निर्माण केले. या पदाकडे मात्र त्यांचे दुर्लक्ष होत आहे. त्यांच्या दुर्लक्षामुळे आर्वी तालुक्यातील ३३ कोतवाल अद्यापही वेतन श्रेणीच्या प्रतीक्षेत आहेत. कोतवालांचे आंदोलन चार वर्षांपासून सुरू असून त्याची शासनाने दखल घेतली नाही. या संदर्भात अनेक प्रस्ताव सादर करण्यात आले, पण ते मंत्रिमंडळात नामंजूर करण्यात आले.१९ जुलै २००१ च्या शासन परिपत्रकानुसार पाच वर्षे सेवा झालेल्या व ४५ वर्षांच्या आत असलेल्या कोतवालांना वर्ग चारमध्ये नियुक्ती देत शासकीय सोयीसवलती देण्याची तरतूद आहे; परंतु सेवा ज्येष्ठ कोतवालांना यापासून वंचित ठेवण्यात येत आहे. पूर्वी विशिष्ट समाजातील तरुण कोतवालाची नोकरी करीत होते; मात्र आता कोतवालाची नोकरी करण्यासाठी सध्याच्या बेरोजगाराीमुळे सर्व समाजातील तरुण अर्ज करतात. त्यादृष्टीने सोयी सवलती आवश्यक आहेत. वयाच्या साठीपर्यंत सेवा देवून त्यांच्या गाठीला काहीच शिल्लक नसल्याने महसूल विभागातील वयोवृद्ध कोतवालांना हलाखीचे जीवन जगावे लागते. चतुर्थ श्रेणीचा दर्जा नसलेल्या कोतवालाला ५५ वर्षांपासून शासनाने वर्गीकृत न करता अवर्गीकृत ठेवल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्यांना सेवानिवृत्ती वेतन, मोबदला किंवा एकरकमी रक्कम आदी मिळत नाही. जीव धोक्यात घालून सेवा करणारे कोतवाल आयुष्याच्या शेवटी निराधार होतात. प्रसंगी एखाद्या उपहारगृहात कपबश्या धुतात. कुणाच्या कारखान्यात अथवा शेतावर रखवाली करून उरनिर्वाह करीत असल्याचे चित्र आहे.आता एका साझ्याला एक कोतवाल आहे. शासनाच्या धोरणात कोतवालांकरिता काहीच नाही शासनाच्या धोरणामुळे कोतवाल दुर्लक्षीत झाला आहे. पर्यायाने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येत आहे. देशातील गुजरात व त्रिपूरा राज्यात मात्र कोतवालांना शासकीय कर्मचारी म्हणून मान्यता आहे. राज्याच्या स्थापनेपासून त्यांना केवळ आश्वासन, वचन व शब्द देण्यातच सत्ताधाऱ्यांनी खेळी केली आहे. महागाईच्या काळात अत्यल्प मानधनात कोतवाल कुटुंबाचे शिक्षण व पालन पोषण योग्य रितीने करू शकत नाही.ग्रामीण भागात तलाठ्यांना सर्व कामास मदत करणारा, नैसर्गिक आपत्तीच्या काळात संपूर्ण माहिती शासनास देणारा, कर वसुलीत सहकार्य करणारा, शासकीय आदेशांना ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहचविणारा, २४ तास सेवेत राहणारा, कोतवाल ग्रामपंचायतीपासून लोकसभेच्या निवडणुकापर्यंत धावपळ करतो. पण त्याच्या वाट्याला अखेरच्या क्षणी काहीच येत नाही. याची दखल शासनाले घेणे गरजेचे झाले आहे.