शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

पोलीसदादाला आली जखमी वासराची दया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 21:50 IST

पोलीस म्हटले की कठोर मनाचेच असे बोलले जाते. परंतु, त्यांच्यातही दया कायम असल्याचे चित्र सेलूकरांना बघावयास मिळाले. अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या वासरावर पोलीस दादांनी सामाजिक बांधिलकी जोपासत प्रथमोपचार करून जणू त्याला त्याच्या दु:खाच्या प्रसंगी धीरच दिला.

ठळक मुद्देप्रथमोपचार करून जोपासली सामाजिक बांधिलकी

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : पोलीस म्हटले की कठोर मनाचेच असे बोलले जाते. परंतु, त्यांच्यातही दया कायम असल्याचे चित्र सेलूकरांना बघावयास मिळाले. अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या वासरावर पोलीस दादांनी सामाजिक बांधिलकी जोपासत प्रथमोपचार करून जणू त्याला त्याच्या दु:खाच्या प्रसंगी धीरच दिला.सेलू पोलीस ठाण्यासमोर भरधाव असलेल्या अज्ञात वाहनाने एका वासराला जबर धडक दिली. या अपघातानंतर सदर वाहनचालकाने वाहनासह घटनास्थळावरून पळ काढला. परंतु, जखमी वासरू जीवाच्या आकांताने तडफड होते. घटनेची वार्ता परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती. मात्र, या मुक्या जनावराच्या मदतीसाठी कुणीच पुढे येण्यास तत्पर्ता दाखवित नव्हते. अशातच सदर बाब सेलू पोलिसांच्या लक्षात आली. त्यांनी लगेच जखमी वासराला ताब्यात घेत त्यास उचलून ठाण्याच्या आवारात आणले. त्याच्यावर प्राथमिक उपचार करीत पोलिसांनी सामाजिक बांधिलकी जोपासत त्यास पाणी पाजले. शिवाय वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून त्याच्यावर उपचार करीत जखमी वासराला जणू धीरच दिला. तपासणी अंती पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी वासराचे हाड मोडल्याचे सांगितले. जखमी वासराला मदत करण्यासाठी जमादार रवींद्र खरे, वामन घोडे, विनोद वानखेडे, मंगेश वाघाडे आदींनी सहकार्य केले.