शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

खरीप पीककर्ज वाटपात राष्ट्रीयीकृत बँका ‘लेटलतीफ’

By admin | Updated: June 1, 2015 02:19 IST

७१0 कोटींच्या उद्दिष्टांपैकी केवळ २४७ कोटींचे वाटप; २५ हजार शेतक-यांना मिळाला लाभ.

संतोष वानखडे / वाशिम : पेरणीचा हंगाम ८-१0 दिवसांवर येऊन ठेपलेला असतानाही शेतकर्‍यांना खरीप पीककर्ज वाटप अल्प प्रमाणातच होत असल्याची साक्ष आकडेवारी देत आहेत. अलाहाबाद व बँक ऑफ इंडियाचा अपवाद वगळता उर्वरित राष्ट्रीयीकृत बँकांनी खरीप पीककर्ज वाटप फारसे गांभीर्याने घेतले नाही. ७१0 कोटींच्या उद्दिष्टांपैकी २५ हजार ९३ शेतकर्‍यांना २४७ कोटींचे वाटप करण्यात आले आहे. कृषिप्रधान देशातील शेतकरी अर्थव्यवस्था ताळ्यावर आणण्याचा प्रयत्न करीत आहेत, तर दुसरीकडे विद्यमान ह्यव्यवस्थाह्ण शेतकर्‍यांचा जणू ह्यअर्थह्णच काढून घेत आहे. यात निसर्गाचा लहरीपणा अधिकच भर टाकत आहे. इतरांना भरभरून देणारा, स्वत:च्या घामरुपी सिंचनातून अन्नधान्याचे उत्पादन करणारा देशाचा पोशिंदा शेतकरी स्वत: मात्र शोषित जिणे जगत असल्याची विदारक स्थिती आहे. २0१४ या वर्षात पावसाने दगा दिला. त्यानंतर परतीच्या पावसानेदेखील शेतकर्‍यांचा भ्रमनिरास केला. विविध कारणांमुळे खरीप व रबीचे समाधानकारक पीक हाती आले नाही. संकटांची ही मालिका कमी म्हणून की काय, यात शेतमालाच्या अत्यल्प भावाची भर घालण्यात आली. सोयाबीनचे उत्पादन घटले; मात्र बाजारभावही गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी कमी आहेत. चोहोबाजूंनी आलेल्या चक्रीवादळात अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी कोलमडून गेला. आता पुन्हा नव्या उमेदीने बँकांच्या पीककर्जरूपी कुबड्यांच्या आधारावर उभे राहण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत. या प्रयत्नांना अलाहाबाद, अकोला जिल्हा मध्यवर्ती बँक, बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय या बँकांचा अपवाद वगळता अन्य राष्ट्रीयीकृत बँका फारसा प्रतिसाद देत नसल्याचा अनुभव शेतकर्‍यांना येत आहे. मार्च महिन्यापासूनच पीककर्जाच्या वितरणात आघाडी घेणार्‍या अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मे महिन्यापर्यंत २१0 कोटींहून अधिक खरीप पीककर्जाचे वाटप केले आहे. अलाहाबाद बँकेने ४.७८ पैकी ३.८४ कोटी, बँक ऑफ इंडियाने ४.९५ पैकी तीन कोटी, कॅनरा बँक १.९६ कोटीपैकी ६५ लाख, युनियन बँक ऑफ इंडिया ४.३७ पैकी १.४५ कोटी, आयसीआयसीआय ४.९१ पैकी १.८२ कोटी असे प्रमुख बँकांचे कर्जवाटप आहे. अन्य बँकांनी उद्दिष्टपूर्तीचे १0 टक्केही गाठले नाहीत.