शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

यंदा ४.१८ लाख हेक्टरवर खरीप

By admin | Updated: April 25, 2017 00:55 IST

खरीप हंगाम २०१७-१८ मध्ये जिल्ह्यात ४ लाख १८ हजार ५०० हेक्टर क्षेत्र लागवडीखाली राहणार आहे.

६३ हजार ५७५ क्विंटल बियाणे तर ७३ हजार ४०० मे.ट. खताची गरज वर्धा : खरीप हंगाम २०१७-१८ मध्ये जिल्ह्यात ४ लाख १८ हजार ५०० हेक्टर क्षेत्र लागवडीखाली राहणार आहे. यात कापूस २ लाख २२ हजार हेक्टर, सोयाबीन १ लाख ९ हजार २५० हेक्टर, तूर ७७ हजार ७०० हेक्टरवर लागवडीचा अंदाज आहे. गत वर्षीच्या तुलनेत तुरीचे क्षेत्र ६ हजार ७०० हेक्टरने वाढणार असून सोयाबीन पिकाचे क्षेत्र कमी होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. हरभरा, गहू आणि रब्बी ज्वारीच्या पिकाचे क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न करावे, अशा सूचना सभाध्यक्ष आ. समीर कुणावार यांनी दिल्यात. विकास भवन येथे खरीप हंगाम आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी, आ. रणजीत काबंळे, जि.प. उपाध्यक्ष कांचन नांदूरकर, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, कृषी सभापती मुकेश भिसे, शिक्षण व आरोग्य सभापती जयश्री गफाट, सभापती रिता गजाम, सोनाली गरडे, जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी नयना गुंडे, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी प्रमोद पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती, जिल्हा कृषी विकास अधिकारी खळीकर, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. सुरेश नेमाडे उपस्थित होते.या खरीपाकरिता ६३ हजार ५७६ क्विंटल बियाण्याची मागणी केली असून २४ हजार ४६२ क्विंटल बियाणे महाबीज कडून तर ३९ हजार ११४ क्विंटल बियाणे इतर कंपन्या पुरविणार आहे. तसेच ७३ हजार ४०० मेट्रीक टन खताची गरज आहे. जिल्ह्यात ठिंबक सिंचनाचा वापर वाढत असल्यामुळे ठिंबक संचामधून देता येतील, अशी विद्राव्य खते कृषी केंद्रामध्ये उपलब्ध करुन द्यावी, अशा सूचना आ. कुणावार यांनी दिल्या.बँक अधिकाऱ्यांना नोटीस बजावणार वर्धा : खरीप हंगामाच्या बैठकीमध्ये पीक कर्जाचे नियोजन करण्यासाठी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक तसेच इतर बँकाचे अधिकारी अनुपस्थित राहिल्याबद्दल त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश अध्यक्षांनी दिले. तसेच पीक कर्जाचे वितरण करण्यासाठी गावागावात बैठका घेऊन नियोजन करावे.(प्रतिनिधी) ३० मे पूर्वी शेतकऱ्यांना पीक कर्ज वितरित करण्याच्या सूचनाखरीप हंगाम २०१७-१८ साठी शेतकऱ्यांना बियाणे, खते व किटकनाशके उत्तम गुणवत्तेचे पुरविण्यात यावे. शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही, याची काळजी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेण्यासोबतच बँकांनी ३० मे पूर्वी ९० टक्के शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक कर्ज वितरीत करावे, अशा सूचना खरीप हंगाम आढावा बैठकीचे अध्यक्ष आ. समीर कुणावार यांनी केल्यात. यावेळी उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांचीही उत्तरे देण्यात आली.सरकारी कंपन्यांवर कारवाईभूईमुगांच्या प्रात्याक्षिकासाठी शेतकऱ्यांना नॅशनल सिड्स कॉर्पोरेशनने पुरविलेले बियाणे बोगस निघाले यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. असे प्रकरण खासगी कंपन्याबाबत घडले असते तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तोच नियम सरकारी कंपन्यांना लागू करून त्यांच्यावर रितसर कारवाई करण्याच्या सूचना अध्यक्षांनी केल्या आहेत.