शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

केसरी कार्डधारक धान्यापासून वंचित

By admin | Updated: March 13, 2017 00:46 IST

ग्रामीण भागातील शेतकरी व केसरी कार्ड धारकांना अत्यल्प दरात स्वस्त धान्य दुकानातून धान्य दिले जात होते;

ग्रामस्थ, शेतकरी त्रस्त : खुल्या बाजारातून महागडे धान्य घेण्याची वेळ देवळी/कोळोणा (चोरे) : ग्रामीण भागातील शेतकरी व केसरी कार्ड धारकांना अत्यल्प दरात स्वस्त धान्य दुकानातून धान्य दिले जात होते; पण शासनाने अचानक एक अध्यादेश काढून हे धान्य बंद केले. परिणामी, ग्रामीण भागातील केसरी कार्ड धारकांना फटका बसला आहे. शेतकऱ्यांचीही गळचेपी झाली आहे. केसरी कार्डधारक कुटुंब तथा शेतकऱ्यांना अल्प किमतीत गहू आणि तांदूळ मिळत होते. एपीएल कार्ड धारकांना पूर्वीपासून तर शेतकऱ्यांना स्वस्त धान्य पुरविण्याची योजना एक वर्षापासून राबविली जात होती. परिणामी, कुणीही धान्याचा साठा करून ठेवला नाही. त्यांना प्रत्येक महिन्यात अल्प दरात धान्य मिळत असल्याने धान्याची साठवणूक करण्याची कुणाला गरज वाटली नाही; पण अचानक शासनाने हा धान्य पुरवठा बंद केला. यामुळे कार्डधारकांची गोची झाली आहे. स्वस्त धान्य दुकानात या महिन्याचा धान्याचा साठा आला असता संबंधित कार्डधारक मालाची उचल करण्यासाठी दुकानात गेले. याप्रसंगी स्वस्त धान्य दुकानदाराने तुमचे धान्य बंद करण्यात आले आहे, असे सांगितले. या प्रकारामुळे कार्डधारक चक्रावले. आमचे धान्य अचानक कसे बंद झाले यावरून दुकानदाराशी काही ग्राहकांचे वादही झाले; पण दुकानदाराचा नाईलाज होता. महिन्याला जितक्या रकमेत दहा किलो धान्य मिळत होते, तितक्या रकमेत दोन तीन किलोही धान्य बाजारात मिळू शकत नाही. पैसे असताना ग्रामीण भागात धान्य मिळत नाही, अशी स्थिती ग्रामीण केसरी कार्डधारक तथा शेतकऱ्यांची झाली आहे. याबाबत शासनाने गांभीर्याने विचार करून बंद करण्यात आलेली योजना पुर्ववत सुरू करून शेतकऱ्यांना आर्थिक बोजातून बाहेर काढावे, अशी मागणी नरेश ओंकार, रवींद्र उपासे, नाना थोटे, प्रशांत मुनेश्वर, भाग्यवान भस्मे, नंदू भस्मे, सम्यक ओंकार, रमेश गोबाडे, उमेश चावरे, संदीप चावरे, देवानंद वागदे आदींनी निवेदनातून केली आहे.(प्रतिनिधी/वार्ताहर)