शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

केजाजींच्या जयघोषाने घोराड दुमदुमले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 23:55 IST

टाळ, मृदंगाचा गजर आणि डोक्यावरती तुळशी वृंदावन घेऊन संत केजाजी महाराजांचा पालखी सोहळा रंगला. भाविक भक्तांसह २०० दिंड्यांनी सहभागी होऊन ‘राम कृष्ण हरी’चा जयघोष केला.

ठळक मुद्देदोनशे दिंड्यांचा सहभाग : डोळ्याचे पारणे फेडणारा रिंगण सोहळा, बोरतिरावर फुलला भाविकांचा मेळा

विजय माहुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कघोराड : टाळ, मृदंगाचा गजर आणि डोक्यावरती तुळशी वृंदावन घेऊन संत केजाजी महाराजांचा पालखी सोहळा रंगला. भाविक भक्तांसह २०० दिंड्यांनी सहभागी होऊन ‘राम कृष्ण हरी’चा जयघोष केला. दिवसभर चाललेल्या या पालखी सोहळ्याने बोरतीर्थ दुमदुमले होते. भक्तिरसात दंग झालेल्या भाविकांचा उत्साह डोळ्याचे पारणे फेडणारा ठरला.येथील बोरतिरावर तीर्थक्षेत्र घोराड येथे संत केजाजी महाराज यांच्या ११२ व्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी प्रमाणे याही वर्षी पालखी दिंडी सोहळा मंगळवारी पार पडला. या सोहळ्यात गावातील युवा मंडळांनी बैल बंडीवर रथ तयार करुन ते दिंडीत सहभागी झाले. बँडबाजासह अश्वाची सवारी आणि युवकांनी केलेली वेगवेगळी वेशभूषा हे दिंडेचे आकर्षण ठरली. सकाळी १० वाजता विठ्ठल रुख्माई मंदिरातून पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. दिंडी गरुड, हनुमान मंदिराकडून बोर तिरावरील पुंडलीकांच्या भेटीला गेली. पुंडीलीकांच्या मंदिराला प्रदक्षिणा करीत असताना भाविकांकडून होत असलेला हरिनामाचा गजर पंढपुरातील चंद्रभागेच्या तिरावरची अनुभूती देत होता. सर्व दिंड्या संत नामदेव महाराज समाधी मैदानावर पोहचताच या ठिकाणी दिंड्यांचा रिंगण सोहळा पार पडला. डोळ्याचे पारणे फेडणारा रिंगण सोहळा पाहण्यासाठी विदर्भातील असंख्य भाविकांची उपस्थिती होती. रिंगण सोहळ्यानंतर दिंड्या गावातील प्रमुख मार्गाने परिक्रमा केली. यावेळी ग्रामस्थांनी ठिकठिकाणी स्वागत करीत चहा, नाश्ता दिला. घोराडनगरीला मिळालेला भक्तीचा वसा येथे दिंडी परिक्रमेत अनुभवास मिळाला. विणेकऱ्यांचे ठिकठिकाणी पाय धुवून त्यांना कुंकू टिळा लावला जात होता. गावातील प्रत्येक रस्ता रांगोळ्यानी सजला होता. चौकाचौकात केलेले देखावे संत महिमांची प्रचिती देत होते. तब्बल ९ तास चाललेल्या दिंडी सोहळ्यात २ किलो मीटर अंतराची परिक्रमा पूर्ण केली. या सोहळ्याला वर्धा जिल्ह्यासह भंडारा, गोंदिया, नागपूर व चंद्रपूर जिल्ह्यातील भजन मंडळांनी सहभागी होऊन केजाजी महाराजांच्या नामघोषाने आसमंत निनादून सोडला.एकोप्याने साजरा होतोय उत्सवगावात अनेक जाती धर्माचे लोक राहतात. पण, केजाजी महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्या निमित्त आयोजित या कार्यक्रमात सारेच आपसी मतभेद विसरुन एक होतात. त्यांच्या एकीच्या बळातून मदतीचा हात पुढे करीत हा पालखी व दिंडी सोहळा साजरा करण्यात आला. गावातील ऐेकी आणि सर्वधर्म समभाव यामुळेच सोहळा डोळ्याचे पारणे फेडणारा ठरत आहे.गावात दिवाळीची प्रचिती‘साधू, संत येती घरा; तोची दिवाळी, दसरा’ अशी म्हण प्रचलीत आहे. हीच या सोहळ्याच्या दिवसात घोराडवासियांना अनुभवायला येतात. प्रत्येकांच्या घरी पाहुणे मंडळी येतात. यानिमित्ताने मुलीही माहेरी येतात तसेच बाहेर जिल्ह्यातूनही भक्तगण व संत मंडळी गावात असल्याने गावाभर रोषणाई केली जाते. प्रत्येक रस्ताच नव्हे तर सेलू व हिंगणी मार्गही भाविकांनी फुलून जात आहे.आज काला, दहीहंडी व महाप्रसादया सोहळ्यानिमित्त बुधवारी दुपारी ११ वाजता डॉ. आकरी महाराज यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. सायंकाळी ४ वाजता विठ्ठल महाराज भांदक्कर यांच्या हस्ते दहिहांडी फुटणार आहे. त्यानंतर सायंकाळी नगर भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. या महाप्रसादाला जवळपास ३० हजार भाविकांची उपस्थिती राहणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.