शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कॉटन मिलच्या आतील व बाहेरील परिसर स्वच्छ ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 22:54 IST

गतवर्षी जिल्ह्यात कापूस पिकावर बोंडअळीसह विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला होता. हा कापूस मोठ्या प्रमाणावर खासगी जिनिंग प्रेसिंग मालकांनी खरेदी केला व यावर मिलमध्ये प्रक्रिया करण्यात आली. पुन्हा यंदा असा प्रादुर्भाव होवू नये, याकरिता सर्व मिलधारकांनी मिलच्या आतील व बाहेरील परिसर स्वच्छ करून कुठेही बोंडअळीचे पंतग तयार होवून त्याचा प्रसार होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिल्या.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : जिनिंग प्रेसिंग मालक व व्यवस्थापकांची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गतवर्षी जिल्ह्यात कापूस पिकावर बोंडअळीसह विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला होता. हा कापूस मोठ्या प्रमाणावर खासगी जिनिंग प्रेसिंग मालकांनी खरेदी केला व यावर मिलमध्ये प्रक्रिया करण्यात आली. पुन्हा यंदा असा प्रादुर्भाव होवू नये, याकरिता सर्व मिलधारकांनी मिलच्या आतील व बाहेरील परिसर स्वच्छ करून कुठेही बोंडअळीचे पंतग तयार होवून त्याचा प्रसार होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिल्या.सोमवारी त्यांनी जिल्ह्यातील सर्र्व जिनिंग व प्रेसिंग मिलचे मालक, व्यवस्थापक यांची बैठक पार पडली. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. याप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. विद्या मानकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. जिल्हाधिकारी नवाल म्हणाले की, पडलेल्या सरकीपासून झाडे उगवली असल्यास ती उपटून टाकून कोणत्याही ठिकाणी सरकीपासून झाड उगवू देऊ नका. पतंगाचा अटकाव करण्यासाठी प्रत्येकी दहा मिटर अंतरावर एक कामगंध सापळा याप्रमाणे सगळीकडे कामगंध सापळे लावावे. त्यामध्ये सापडणाºया पतंगाची गणना करून तालुका कृषी अधिकाºयांना कळवावे. ठिकठिकाणी प्रकाश सापळे संध्याकाळी ६ ते ११ च्या कालावधीत लावून जास्तीत जास्त पतंग किटक जमा होतील, अशी व्यवस्था करावी. या सर्व बाबींवर कार्यवाही न करणाºया मिलधारकांवर फौजदारी कलम १३३ अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच पर्यावरणास धोका निर्माण करणे याबाबींतर्गत पर्यावरण कायद्याच्या आधारे परवाना रद्द करण्याबाबत संबंधीत मंत्रालयास प्रस्ताव पाठविण्यात येईल. सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण होईल, असे कृत्य केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात येईल असेही यावेळी त्यांनी सांगितले. सर्व मिलधारकांनी सामाजिक जबाबदारी ओळखून त्यांच्या २ कि.मी परिसरातील शेतकºयांना किंवा एक हजार शेतकºयांना मोफत कामगंध सापळे व दोन ल्युर्स उपलब्ध करून द्यावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांनी त्यांच्या परिसरातील दोन हजार शेतकºयांना कामगंध सापळे व ल्युर्स उपलब्ध करून द्यावे, अशी सूचनाही जिल्हाधिकाºयांनी केल्या.हिंगणघाटात सर्वाधिक खरेदीबोंडअळीच्या प्रकोपानंतरही हिंगणघाट बाजार समितींतर्गत सर्वाधिक कापसाची खरेदी जिल्ह्यात झाली होती. त्यामुळे हिंगणघाट, आर्वी, देवळी, वर्धा, सेलू येथील जिनिंग प्रेसिंग कंपनीसह जिल्ह्याच्या विविध भागातील मिल मालकांना जिल्हाधिकाºयांनी बैठकीतून प्रकोप वाढू नये यासाठी स्वच्छतेवर भर देण्याचे निर्देश दिले. यावेळी व्यावसायिकांनीही बाजू मांडली.