शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
2
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
3
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
4
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
5
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
6
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
7
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
8
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन
9
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
10
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
11
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
12
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
13
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
14
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
15
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
16
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
17
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
18
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
19
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
20
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."

बापूंचा अमूल्य ठेवा सर्वांसाठीच प्रेरणादायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 22:54 IST

येथील गांधी सेवा संघामध्ये बापूंचे अमूल्य असे दस्तावेज संग्रहीत असून अध्ययनासाठी येणाऱ्यांना नक्कीच प्रेरणादायी ठरणारे आहे. महादेवभाई भवन परिसरात आणि याच इमारतीला लागून गांधी सेवा संघाची वास्तू आहे. स्थापन झालेली एकमेव संस्था म्हणून गांधी सेवा संघ होय. याची स्थापना १३ जुलै १९२३ रोजी झाली.

ठळक मुद्देमहादेवभाई भवनातील गांधी सेवा संघ : ग्रंथालयातील पुस्तकातून मिळतेच इतिहासाची साक्ष

दिलीप चव्हाण।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : येथील गांधी सेवा संघामध्ये बापूंचे अमूल्य असे दस्तावेज संग्रहीत असून अध्ययनासाठी येणाऱ्यांना नक्कीच प्रेरणादायी ठरणारे आहे. महादेवभाई भवन परिसरात आणि याच इमारतीला लागून गांधी सेवा संघाची वास्तू आहे. स्थापन झालेली एकमेव संस्था म्हणून गांधी सेवा संघ होय. याची स्थापना १३ जुलै १९२३ रोजी झाली.गांधीजींनी सांगितल्याप्रमाणे अखिल भारतीय रचनात्मक संस्थांच्या नोंदी दस्तावेज, प्रकाशन, पुस्तक व पत्रिकांचे संकलन आदी कार्य करणे तसेच त्यांचे सरंक्षण, चांगल्या प्रकारची व्यवस्था करून आदर्श ग्रथालयाची निर्मिती गांधी सेवा संघाने करून कार्य आणि ठेवा पुढच्या पिढीसाठी अद्ययावत करून ठेवण्याचे कार्य केले आहे आणि ते सुरूही आहे. गांधीजींचे पत्र, प्रमाणपत्र, बंदर, तराजू, पदक, तसेच सुधारीत चरखा आदी ग्रंथालयात पहावयास मिळते. याच संग्रहीत अमूल्या ठेव्यासोबत सूतांच्या गुंड्यांपण आहेत. यामध्ये १०० नंबरपासून तर ४०० नंबरच्या सूताचा समावेश आहे. भारतात आगपेटीच्या डब्बीत पैठणी मावत होती असे सांगितल्या गेलेले आहे. यावर विश्वास बसत नाही; पण गांधी सेवा संघामध्ये इतक्या बारीक सूताची गुंडी पाहायला मिळते. यावरून नक्कीच पैठणीच्या सांगितल्या जाणाºया विषयावर नक्कीच विश्वास बसू शकतो. गांधी सेवा संघाचे ग्रंथालय अध्ययनासाठी जितके महत्वाचे आहे, तितकेच किंबहुना त्यापेक्षा जास्त बापूंचा अमूल्य ठेवा आहे.नियमित होते सूतकताईगांधी सेवा संघामध्ये नियमित सूत कताई केली जाते. यात किसान चरखा व पेटी चरखा याचा वापर केल्या जातो. तेथील कर्मचारी स्वत: पेळू तयार करतात. शिवाय कताईसाठी त्याचा उपयोग करतात. याच सूतापासून ते स्वत:साठी कापड तयार करून आणतात. तसेच त्यांनी तयार केलेला कापड गांधीवादी वापरतात.महात्मा गांधी, विनोबा भावे यांचे काही साहित्य व पत्रांचे येथे जतन केले जात आहे. संस्था गांधी साहित्यासोबत या अमूल्य वस्तूंचे महत्व जाणून आहे. ते सुरक्षित व सरंक्षित करून जतन करून ठेवण्यात आलेले आहे.- कनकमल गांधी, अध्यक्ष, गांधी सेवा संघ. सेवाग्राम.वाचनालयात पुस्तक प्रेमी व अध्ययनासाठी विद्यार्थी येतात. येथील साहित्य व अमूल्य ठेवा प्रेरणा देण्याचे काम करीत आहे.- प्रकाश क्षीरसागर, ग्रंथपाल, सेवाग्राम.