शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

कस्तुरबा गांधी यांची १५० वी जयंती बुधवारी होणार साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 11:22 IST

स्वातंत्र्य चळवळीतील योगदान आणि महिलांसाठी आदरणीय कस्तुरबा गांधी यांची १५० वी जयंती ११ एप्रिल रोजी साजरी होत आहे. यानिमित्त पुणे येथे रॅली, मान्यवरांचे व्याख्यान व ग्रंथाचे प्रकाशन आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देदेशभरातील सर्वोदयी व गांधीवादी होणार सहभागी

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : स्वातंत्र्य चळवळीतील योगदान आणि महिलांसाठी आदरणीय कस्तुरबा गांधी यांची १५० वी जयंती ११ एप्रिल रोजी साजरी होत आहे. यानिमित्त पुणे येथे रॅली, मान्यवरांचे व्याख्यान व ग्रंथाचे प्रकाशन आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यात देशभरातून सर्वोदयी व गांधी विचारसरणीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष व समन्वयक जयवंत मठकर यांनी दिली.कस्तुरबा गांधी यांच्या जयंती दिनी सकाळी ८.३० वाजता आगाखान पॅलेस येथील समाधी स्थळ, महात्मा गांधी पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, गंज पेठ, फुले वाडा मार्गे वाहन रॅली निघणार आहे. एस. एम. जोशी सोशालिस्ट फाऊंडेशन सभागृहात माजी न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेत सभा होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार लोकमत नागपूर आवृत्तीचे संपादक सुरेश द्वादशीवार, जयवंत मठकर, आदित्य पटनायक, ‘मिळून साऱ्याजणी’च्या विद्या बाळ, फांऊडेशनचे अध्यक्ष व ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक डॉ. जी.जी. पारेख यासह गांधी व कस्तुरबांचा सत्याग्रह व जीवनशैली यावर सुनिती, कस्तुरबा रचनात्मक कार्य यावर शोभा सुपेकर, कस्तुरबा आणि स्त्री-शक्ती वर डॉ. रझिया पटेल सभेला संबोधित करतील. प्रास्ताविक विद्या बाळ, नीता परदेशी, अ‍ॅड. मधुगीता सुखात्मे करतील. न्या. धर्माधिकारी यांच्या लेखांचे संकलन वर्ध्याच्या गांधी विचार परिषदचे अध्यापक डॉ. रामचंद्र प्रधान यांनी ‘व्युमेन पावर, अ गांधीयन डिसकरेज’ या इंग्रजी भाषांतरीत ग्रंथाचे प्रकाशन याप्रसंगी होणार आहे.कार्यक्रम दोन सत्रात चालणार असून शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मंडळींनी उपस्थित राहावे, असे आहावान महाराष्ट्र सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष डॉ. शिवचरण ठाकूर, पुणे जिल्हा सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. संतोष म्हस्के, विश्वस्त बी.आर. लबडे, संयोजक चंद्रकांत निवंगुणे यांनी केले आहे.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधी