शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कार्तिक पौर्णिमा उत्सवास उसळला जनसागर

By admin | Updated: November 28, 2015 03:09 IST

येथील धम्मभूमीत कार्तिक पौर्णिमा उत्सव आणि वर्षावास समापन कार्यक्रम बुधवारी पार पडला. हजारोंच्या संख्येने बौद्ध बांधवाची यावेळी उपस्थिती होती.

खासदारांकडून धम्मराजिक महाविहाराला २० लाखांच्या मदतीची घोषणा : सांस्कृतिक व सांगीतिक कार्यक्रमाची मेजवानी केळझर : येथील धम्मभूमीत कार्तिक पौर्णिमा उत्सव आणि वर्षावास समापन कार्यक्रम बुधवारी पार पडला. हजारोंच्या संख्येने बौद्ध बांधवाची यावेळी उपस्थिती होती. कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार रामदास तडस, आमदार डॉ. पंकज भोयर, जि. प. शिक्षण सभापती मिलिंद भेंडे, जि. प. सदस्य विरेंद रणनवरे, सरपंच रेखा शेंदरे, उपसरपंच फारूख शेख आदी मान्यवर उपस्थित होते. या धम्मराजिक महाविहाराचे सचिव इंजिनिअर पी.एस. खोब्रागडे यांनी प्रास्ताविकेतून धम्मभूमित राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांबद्दल माहिती दिली. त्यासोबतच तेथील भौतिक सोयीसुविधांच्या उणीवाबाबतही उपस्थितांना अवगत केले.खा. तडस आपल्या अतिथी भाषणात म्हणाले, घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे माझ्यासारखा सर्वसामान्य माणसाला संसदेत जनसामान्यांचे प्रश्न मांडण्याची संधी मिळाली. बाबासाहेब नसते तर आज मी आपल्या समोर नसतो. संविधान दिनाचे औचित्य साधत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांप्रती आपल्या भावना खा. तडस यांनी प्रकट केल्या. तसेच २०१५-१६ व १६-१७ या दोन वर्षात या धम्मराजिक महाविहाराला त्यांच्या निधीतून वीस लाख रूपये देण्याची घोषणा केली.तत्पूर्वी कार्यक्रमाची सुरूवात सकाळी ध्वजारोहनाने करण्यात आली. तसेच समापन, धम्मवंदना, भोजनदान आदी कार्यक्रम अखिल भारतीय भिक्खू संघाचे अध्यक्ष भदंत सदानंद महास्थविर यांच्या मार्गदर्शनात पार पडले. धम्मदेसना कार्यक्रमाला भदंत संघसेना, लेह (लद्दाख) यांची प्रमुख उपस्थिती होती. त्याचप्रमाणे आर. डी. जोगंदड, सीबीआय नागपूरचे डीआयजी संदीप तामगाडगे, विक्रीकर विभागाचे प्रशांत रोकडे यांची यावेळी व्याख्याने झालीत. सोबतच सांस्कृतिक कार्यक्रम आणि भीम व बुद्धगीतांचा कार्यक्रम झाला. रात्री कव्वालीचा कार्यक्रम झाला. भाविकांचा जनसागर रात्रीही कायम होता. संचालन पी. एस. खोब्रागडे व राजेंद्र फुले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भारतीय बौद्ध सेवा संघ, श्रामनेर सत्यानंद स्मारक समिती व उत्सव समितीच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.(वार्ताहर)