शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

लॅन्को कामगारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भीकमांगो आंदोलन

By admin | Updated: October 25, 2016 02:00 IST

मांडवा येथील लॅन्को थर्मल कंपनीच्या कामगारांचे वेतन थकले आहे. दिवाळी सण तोंडावर आल्यामुळे कंपनीने

थकीत वेतनाची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांसमक्ष मंगळवारी चर्चा वर्धा : मांडवा येथील लॅन्को थर्मल कंपनीच्या कामगारांचे वेतन थकले आहे. दिवाळी सण तोंडावर आल्यामुळे कंपनीने कामगारांचे वेतन देण्याची मागणी केली. मात्र याकडे कंपनीने दुर्लक्ष केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घालावे, अशी मागणी करीत सोमवारी कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भिकमांगो आंदोलन केले. आंदोलनादरम्यान कामगारांच्या प्रतिनिधीसोबत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी चर्चा केली. याचवेळी त्यांनी कंपनीच्या व्यवस्थापनाशीही चर्चा केली. दोघांशी झालेल्या चर्चेनंतर मंगळवारी सकाळी ११ वाजता या विषयावर जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षात निर्णायक सभा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीला जिल्हा कामगार अधिकारी, कंपनीचे अधिकारी व कामगार प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याची माहिती कामगार संघटनेचे अध्यक्ष सुनील गफाट यांनी दिली. तत्पूवी कामगारांच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्या सादर करण्यात आल्या. या निवेदनानुसार ७ आॅक्टोबर रोजी कंपनी व्यवस्थापनास कामगार संघटनेच्यावतीने वेतनासंदर्भात अर्ज सादर करण्यात आला होता. त्याकडे दुर्लक्ष झाल्याने पुन्हा २१ आॅक्टोबरला कंपनी व्यवस्थापनाला अर्ज करण्यात आला. तरी कंपनी व्यवस्थापनाकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. आज जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात सीएसएस कामगारांचे जून, जुलै २०१६ च्या वेतनासोबत बोनस, पीएफयुएन नंबर, वेतन स्लिप, जॉईनींग लेटर, एप्रिल-मे २०१६ चे काही कामगारांचे थकीत वेतन, लोकल ठेकेदारांचे थकित पेमेंट देण्याची मागणी करण्यात आली. यासह मृत कामगार श्रीकांत पांडे यांच्या कुटुंबाला अद्यापर्यंत कोणतीही मदत मिळालेली नाही, त्यांना ती देण्यात यावी, सेप्टी फायरच्या कामगारांचे २४ महिन्यांचे थकीत वेतन सन २०१३ जून ते २०१५ जून पर्यंतचे दोन वर्षांचे थकीत वेतन देण्यात यावे, यासह अनेक मागण्या करण्यात आल्या. या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास दिवाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर साजरी करण्याचा इशारा कामागरांनी दिला होता. यावर आता उद्या चर्चा होणार असून त्यात होणाऱ्या निर्णयाकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. यावेळी प्रमोद जावळेकर, मनोज देवळे, राहुल भोरे, प्रदीप नसकरी, बंडू शिंदे, प्रशांत पाटणकर, निखील गांडोळे, मेघनाथ रामटेके, वसीम पठाण, प्रफुल कुटे, प्रमोद लांडगे, मनोज काकेळे, सचिन तामगाडगे, श्याम जावळेकर, अविनाश गफाट यांच्यासह कामगार उपस्थित होते.(प्रतिनिधी)