शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याच्या दुरवस्थेमुळे बस बंद

By admin | Updated: July 5, 2017 00:26 IST

तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या माणिकवाडा ते तारासावंगा या चार किमी रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे.

माणिकवाडा-तारासावंगा रस्ता : प्रवास ठरतोय जीवघेणालोकमत न्यूज नेटवर्क आष्टी (शहीद) : तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या माणिकवाडा ते तारासावंगा या चार किमी रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. रस्ता पूर्णत: उखडला असून प्रवास जीवघेणा ठरत आहे. दररोज नुकसान होत असल्याने या मार्गावरील बससेवाही बंद कदण्यात आली आहे. परिणामी, ग्रामस्थांचे दैनंदिन व्यवहारच प्रभावित झाले आहेत.मागील अनेक वर्षांपासून सदर रस्त्याची दुरूस्ती करण्यात आलेली नाही. जिल्हा परिषद बांधकाम विभाग रस्त्याची दुरूस्ती करण्याकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप सरपंच रत्नपाल पाटील यांनी केला आहे. याबाबत त्यांनी कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले आहे. वर्धा-अमरावती-नागपूर या तीन जिल्ह्यांच्या सिमा तारासावंगा गावाजवळ आहे. या रस्त्याने शाळेतील विद्यार्थी, गावकरी सर्व प्रकारच्या वाहनांनी प्रवास करतात. ४ पैकी १ किमी रस्ता व्यवस्थित आहे; पण उर्वरित ३ किमी रस्त्यावरील सरफेस पूर्ण उखडला आहे. यामुळे दुरूस्ती करणे गरजेचे आहे. याबाबत जि.प. बांधकाम उपविभाग आर्वीचे उपअभियंता अनिल भडांगे यांच्याकडे अनेकदा रस्ता दुरुस्तीची मागणी करण्यात आली. त्यांनी निधी नसल्याचे सांगत वेळ मारून नेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. सध्या पावसाळा सुरू झाला आहे. रात्रीच्या वेळी वाहन नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे रात्री प्रवास करणे कठीण झाले आहे. पावसाळ्यानंतर लगेच रस्ता दुरुस्तीचे काम सुरू होण्याची अपेक्षा सरपंच रत्नपाल पाटील यांनी व्यक्त केली आहे. तत्सम मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.जि.प. बांधकाम विभागाविरूद्ध ग्रा.पं. चा ठरावजिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या विरोधात गावकरी एकवटले आहे. रस्त्याची दुरूस्ती होत नसल्याने ग्रामपंचायतीने जि.प. बांधकाम विभागाविपरूद्ध ठराव घेतला आहे. सदर ठराव सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पाठविण्यात येणार असल्याचे सरपंचांकडून सांगण्यात आले आहे. निधी नसल्याचे कारण देत माणिकवाडा ते तारासावंगा रस्त्याच्या दुरूस्तीकडे जि.प. बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे. वास्तविक, जिल्हा परिषदेकडून निरूपयोगी साधनांवर अनाठायी खर्च केला जातो. ही बाब ग्रामस्थांच्या जिव्हारी लागत असल्याचे दिसते.खासगी वाहनांचा आधारतारासावंगा गावाला जाणाऱ्या बसफेऱ्या रस्त्याच्या त्रासापायी बंद करण्यात आल्या आहेत. यामुळे सकाळी व रात्री अशा मोजक्या बसेस येतात. परिणमी, दिवसभर प्रवाशांना खासगी प्रवासी वाहनांशिवाय पर्याय नाही. याचा परिणाम शाळकरी विद्यार्थ्यांवर होत असून त्यांना वेळेवर शाळेत पोहोचणे कठीण झाले आहे.