शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

बस रोखून नोंदविला निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 21:52 IST

चालकाने काही प्रवाशांना न घेता बस पुढे नेल्याचा आरोप करीत पाठलाग करून कालव्याजवळ बस थांबविण्यात आली. यावेळी संतप्तांनी रापमच्या प्रवासी विरोधी धोरणांचा निषेध नोंदविला. सदर आंदोलनाची माहिती मिळताच यंत्र अभियंत्यांनी आंदोलनस्थळ गाठून संतप्तांशी चर्चा केली. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले.

ठळक मुद्देप्रवाशांना चढविले नसल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : चालकाने काही प्रवाशांना न घेता बस पुढे नेल्याचा आरोप करीत पाठलाग करून कालव्याजवळ बस थांबविण्यात आली. यावेळी संतप्तांनी रापमच्या प्रवासी विरोधी धोरणांचा निषेध नोंदविला. सदर आंदोलनाची माहिती मिळताच यंत्र अभियंत्यांनी आंदोलनस्थळ गाठून संतप्तांशी चर्चा केली. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले.सोमवारी ११.०० वाजताच्या सुमारास वर्धा-हमदापूर ही बस शिवनगर येथे पोहोचली. काही प्रवासी घेऊन आणि अन्य विद्यार्थी व प्रवाशांना तिथे सोडून चालकाने बस पुढे काढली. या प्रकाराने बसखाली राहिलेले प्रवाशांचा पारा चांगलाच चढला. ही बाब लक्षात येताच मनसेचे तालुकाध्यक्ष अतुल पन्नासे यांनी सदर बसचा पाठलाग करून वाहन कालव्याजवळ थांबविले. दरम्यान संतप्त प्रवाशांनीही तेथे गर्दी करून आपला रोष व्यक्त केला. ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांना बसमध्ये का घेतले नाही, असे म्हणत संतप्तांनी चालक व वाहकाला चांगलेच धारेवर धरले होते. या प्रकाराची माहिती मिळताच यंत्र अभियंता नेवारे, आगार व्यवस्थापक पल्लवी चोकट यांनी घटनास्थळ गाठून आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी झालेल्या सकारात्मक चर्चेअंती आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले. या आंदोलनात देऊळगावचे सरपंच अश्वजित चाटे, सूरज कडू, उपसरपंच पद्माकर टोणपे, धनराज पोकळे, गौरव कुंडलवार, देवेंद्र पाठक, नितीन धोबे, सुभाष झाडे, वैद्य, अमोल पन्नासे आदी सहभागी झाले होते.लोकांशी चर्चा करण्यात आल्यानंतर हमदापूर येथे चालक व वाहक यांच्याशी चर्चा करण्यात आली. प्रवाशांनाही विचारले. शिवनगर बस थांब्यावर बस थांबून प्रवासी उतरले आणि चढले. कदाचित काही राहून गेले असेल. गैरसमजुतीतून प्रकार घडला आहे.- पल्लवी चोकट, आगार व्यवस्थापक, वर्धा.