सेवाग्राम : महात्मा गांधी, साने गुरूजी आणि राष्ट्रसेवा दलाचा आदर्श मानून उद्योजक भंवरलाल जैन यांनी शेती व शेतकरी यांच्या उत्थानासाठी कार्य केले. त्यांच्या निधनाने समाजहित जोपासणारी व्यक्ती काळाच्या आड गेल्याची भावना नई तालीम समितीचे अध्यक्ष डॉ. सुगन बरंठ यांनी व्यक्त केली. डॉ. सुगन बरंठ यांचा भंवरलाल जैन यांच्याशी २००६ पासून संबंध आला. गांधीतीर्थच्या स्थापनेचा निर्णय झाल्यापासून तर तो पूर्णत्वास नेण्यापर्यंत डॉ. बरंठ यांनी जैन यांना सहकार्य केले. नई तालीमच्या शिल्पकार आशादेवी व इ. डब्ल्यू. आर्यनाथकम यांच्या नावाने पुरस्कार जाहीर करण्यात आला. यासाठी सर्व सहकार्य जैन एरिगेशनचे लाभले, असे डॉ. बरंठ यांनी सांगितले. भंवरलालजी शिस्तप्रिय अभ्यासक होते. त्यांच्या कार्यालयामध्ये त्यांनी जे.आर.डी. टाटा, पं. जवाहरलाल नेहरू व गांधीजी या तिघआंचे फोटो लावले होते. टाटा सारखे उद्योजक, नेहरूंसारखा विकास तर गांधीजी सारखी जीवन पद्धती हे गुण व मूल्य त्यांनी जीवनात उतरविले. शेती, शेतकरी व पर्यावरण हा त्यांचा आवडता विषय होता. यावरच त्यांनी काम केले असेही डॉ. बरंठ यांनी यावेळी सांगितले.(वार्ताहर)
समाजहित जोपासणारे ंंभंवरलाल जैन- बरंठ
By admin | Updated: February 27, 2016 02:30 IST