शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

१५०० किमी प्रवास करणारी सायकल यात्रा वर्धेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 23:40 IST

महाराष्ट्र पोलीस व वायूदल यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथून काढण्यात आलेली ‘निरोगी आरोग्य व सुरक्षीत प्रवास’चा संदेश देणारी सायकल यात्रा बुधवारी वर्धेत दाखल झाली.

ठळक मुद्दे‘निरोगी आरोग्य, सुरक्षित प्रवास’चा दिला संदेश : महाराष्ट्र पोलीस व वायु दलाचा उपक्रम

ऑनलाईन लोकमतवर्धा : महाराष्ट्र पोलीस व वायूदल यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथून काढण्यात आलेली ‘निरोगी आरोग्य व सुरक्षीत प्रवास’चा संदेश देणारी सायकल यात्रा बुधवारी वर्धेत दाखल झाली. या सायकल यात्रेत वायू व पोलीस दलाचे २० जवान सहभागी झाले आहे. हे जवान नाशिक - नागपूर व नागपूर - नाशिक, असा १,५०० किमीचे अंतर अवघ्या दहा दिवसांत पूर्ण करणार आहेत.या सायकल यात्रेत नाशिक वायूदलाचे दहा जवान तर नाशिक पोलीसचे दहा जवान सहभागी झाले आहेत. २२ फेब्रुवारीला नाशिक येथून निघालेल्या या सायकल यात्रेने धुळे, भुसावळ, अकोला, अमरावती, नागपूर असा प्रवास करीत बुधवारी वर्धा पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले. सर्व सायकलीस्टशी पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांनी संवाद साधला. त्यानंतर पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांनी या सायकलीस्टचा उत्साह वाढविण्यासाठी स्वत: पोलीस अधीक्षक कार्यालय ते वर्धा शहर पोलीस ठाण्यापर्यंत यात्रेत सहभागी होऊन सायकल चालविली. शिवाय या सायकल यात्रेत प्रभारी पोलीस उपअधीक्षक (गृह) पराग पोटे, आर्वीचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मौराळे, वर्धेचे उपविभागीय पोलीस अधिकारी माधव पडिले आदींनी सहभागी होऊन ‘निरोगी आरोग्य व सुरक्षीत प्रवास’चा संदेश दिला. नाशिक येथून निघालेल्या या सायकल यात्रेत नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील गिरमे, नंदू उगले, बाळकृष्ण वेताळ, सुदाम सांगळे, दिनेश माळी, किरण वडजे, संदीप भुदे, हर्षल बोरसे, एम.के. धुम, फुलचंद पवार, देवळाली नाशिक वायुदलाचे संतोष दुबे, सुमित, नितीन पाटील, संजय, एस.ए. जाधव, रवींद्र, धीरज, मनजीत आदी सहभागी झाले. शहर ठाण्याच्या आवारात सायकलीस्टला निर्मलादेवी यांनी निरोप दिल्यानंतर ते पुढील प्रवासासाठी रवाना झाले.एसपी, एसडीपीओ सायकलवरएरवी वातानुकूलित कार अन् वातानुकूलित दालनात कामकाज करणाºया पोलीस अधीक्षकांसह उपविभागीय पोलीस अधिकाºयांनी नागरिकांना सायकल चालविण्याचे कायम फायदे आहेत, हे पटवून देण्यासाठी स्वत: सायकल चालविली. वर्धेतील या अधिकाºयांनी पोलीस अधीक्षक कार्यालय येथून सायकलने शिवाजी चौक, सोशालिस्ट चौक असे मार्गक्रमण करीत वर्धा शहर पोलीस ठाणे गाठले. एसपीसह बडे पोलीस अधिकारी खुद्द सायकल चालवित असल्याने ही सायकल यात्रा बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.