शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

गांधींना उलगडणारा वस्तूमय प्रवास

By admin | Updated: October 1, 2014 23:27 IST

देशाला स्वयंपूर्ण करायचे असेल तर आपल्याला गरज असलेली प्रत्येक वस्तू आपणच बनविली पाहिले. यातून आपण स्वयंपूर्ण तर होऊच पण कुणाकडे हात पसरवून आर्थिक गुलाम होण्याची गरज पडणार नाही.

महात्मा गांधी जयंती विशेष : गांधींनी न वापरलेल्या वस्तू संग्रहीपराग मगर - वर्धा देशाला स्वयंपूर्ण करायचे असेल तर आपल्याला गरज असलेली प्रत्येक वस्तू आपणच बनविली पाहिले. यातून आपण स्वयंपूर्ण तर होऊच पण कुणाकडे हात पसरवून आर्थिक गुलाम होण्याची गरज पडणार नाही. हे त्याच काळात ओळखल्याने ते स्वयंपूर्र्णतेबाबत आग्रही होते. आणि ते जमत नसेल तर मर्यादित गरजा हे सूत्र त्यांनी आयुष्यभर जपले. मगनवाडी संग्रहालयात ठेवलेल्या त्यांच्या वस्तू पाहून ते प्रत्ययास येते. त्या वस्तू पाहतानाचा प्रवासही गांधींना नव्याने भेटल्याचा भास करवून देतो. महात्मा गांधी यांच्या १४५ व्या जयंतीदिनी घेतलेला त्याचा खास आढावा.महात्मा गांधींनी खादी आणि ग्रामोद्योग यांचा वापर स्वातंत्र्यप्राप्तीचे अस्त्र म्हणून केले. गांधीजींचे पुतणे मगनलाल गांधी यांनी खादी आणि ग्रामोद्याग करीत असलेल्या कारागिरांना शोधून काढले आणि त्या उत्पादन प्रणालीला पुनर्जीवित केले. त्यामुळे गांधीजींनी मगनलाल यांच्या जुळलेल्या स्थानांना शोधून काढून तेथे त्यांच्या नावे वास्तू स्थापन केल्या. त्यातीलच एक म्हणजे वर्ध्यातील मगन संग्रहालय. या संग्रहालयाचे उद्घाटन १९३४ साली गांधीजींनी केले. सेवाग्राम आश्रमात गांधीजी वापरत असलेल्या अनेक वस्तू मगनसंग्रहालयात ठेवलेल्या आहेत; परंतु अनेकांना माहीत नसलेल्या गांधीजींनी वापरातल्या तर काही न वापरलेल्या वस्तू येथे जतन करून आहेत. या वस्तंूमधून गांधींना उलगडणारा प्रवास त्यांच्या वेगळ्या स्वरूपाचे दर्शन घडवितो. यातल्या बहुतेक वस्तू या गांधींना भेट दिलेल्या आहेत. यामध्ये अतिशय सुंदर व बारिक कलाकुसर केलेली लाकडाची थाळी, पानपुडा, फोटोफ्रेम, पाण्याचा कमंडलू, कलाकुसर केलेले लाकडाचे सुंदर बक्से नजरेस पडतात. ताडाच्या पानावर बंगाली भाषेत लिहिलेली गांधींची आत्मकथा, वेगवेगळे शंख, बुद्धाची प्रतिमा, काठी, बापू दक्षिण आक्रिकेत मे १९२४ मध्ये देण्यात आलेली चामड्याची पेटी(नेटाल), बापुंची हस्तलिखितं, गांधीजी तुरुंगात असताना त्यांनी वापरलेले चमचे, चाकू, ते वापरत असलेला सर्वात लहान तकली चरखा, जपमाला अशा अनेक वस्तू एका प्रवासासारख्या भासतात.