शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

जनकृषी केंद्राचा प्रस्ताव रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 15:40 IST

वाढता शेती खर्च, यातून निर्माण होणारा कर्जबाजारीपणा, शेतकरी आत्महत्या आदी रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून एकच मिशन शेतकरी आरक्षणने जनकृषी केंद्रांची संकल्पना मांडली आहे.

ठळक मुद्देकेंद्र, राज्य सरकारचे दुर्लक्ष१६०० गावांनी पाठविले होते ठराव

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वाढता शेती खर्च, यातून निर्माण होणारा कर्जबाजारीपणा, शेतकरी आत्महत्या आदी रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून एकच मिशन शेतकरी आरक्षणने जनकृषी केंद्रांची संकल्पना मांडली आहे. याबाबत केंद्र व राज्य सरकारकडे दोन वर्षांपूर्वी प्रस्ताव पाठविण्यात आला, मात्र सरकारने यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही.एकच मिशन शेतकरी आरक्षण या चळवळीची सुरूवात वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम आश्रमातून करण्यात आली. या चळवळीच्यावतीने शेतकरी आरक्षणाची मागणी करण्यात आली असून याबाबत राज्यासह देशाच्या विविध भागांतून १६०० ठराव सरकारला पाठविण्यात आले. या ठरावात जनकृषी केंद्राच्या निर्मितीचाही समावेश आहे.शेतकऱ्यांचा शेती खर्च कमी करण्यासाठी शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात बियाणे उपलब्ध व्हावे यासाठी जनकृषी केंद्र उघडण्यात यावे, असा प्रस्ताव एकच मिशन शेतकरी आरक्षणाने केंद्र व राज्य सरकारकडे दिला होता, मात्र यावर कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे शेतकºयांना यावर्षीच्या खरीप हंगामात महागडी बियाणे व खते खरेदी करावी लागणार आहे. विदर्भासह राज्याच्या विविध भागात शेतकºयांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. यामागे उत्पादित होणाऱ्या मालाला बाजारभाव नसल्याने मुख्य कारण सांगितले जाते. शेतीचा वाढता खर्च, त्या तुलनेत कमी होणारे उत्पादन व बाजारपेठेत शेतमाल आल्यानंतर पडणारे भाव आदी अनेक कारणे आहेत. यावर उपाय म्हणून एकच मिशन शेतकरी आरक्षणने जन कृषी केंद्र सुरू करण्याबाबत सरकारला सुचविले होते. या प्रस्तावाला प्रत्येक गावात शासनाच्या वतीने जन कृषी केंद्र सुरू करण्यात यावे, शेतकऱ्यांना विविध जातीचे संशोधित व पारंपरिक बियाणे उपलब्ध करून देण्यात यावे. हे बियाणे अल्प दरात वा मोफत उपलब्ध व्हावे, अशा अनेक मागण्या या प्रस्तावातून करण्यात आल्या आहेत. एकच मिशन शेतकरी आरक्षणचे प्रणेते शैलेश अग्रवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हा प्रस्ताव पाठविला आहे. परंतु, अजूनही केंद्र व राज्य सरकारने जन कृषी केंद्र सुरू केलेले नाही. राज्याच्या विविध जिल्हा सामान्य रुग्णालयात जेनेरिक औषध दुकान सरकारने सुरू केले. त्याच धर्तीवर प्रत्येक तालुका मुख्यालयात किमान एक जन कृषी केंद्र सुरू करावे, अशी मागणी होती. यापूर्वी राज्यात शेतकºयांना खरेदी विक्री संस्थांच्या माध्यमातून परमीटवर बियाणे पुरवठा करण्यात येत होता. मात्र, खरेदी विक्री संस्था डबघाईस आल्याने हा पुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे जनकृषी केंद्र फायदेशीर ठरणारे आहे.शेतकरी आरक्षणावर अजूनही मौनएकच मिशन शेतकरी आरक्षणाच्या माध्यमातून शेती व शेतकºयाला आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली. विविध ग्रामपंचायतींनी तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीने याबाबत ठराव पारित केले. केंद्र व राज्य सरकारसह विरोधी पक्ष नेत्यांना व राजकीय पक्ष प्रमुखांना त्याच्या प्रति देण्यात आल्या. याबाबत सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नाही.

रसायनामुळे होणाऱ्या स्वास्थ्यहानीला आळा घालण्यासोबतच शेतकऱ्यांच्या उत्पन्नातील नफा वाढविण्याच्या दृष्टिकोनातून जन कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून मोफत बियाणे, सेंद्रिय खते, औषधी देण्याचा पर्याय सुचविण्यात आला आहे. मात्र, केंद्र व राज्य सरकार याबाबत उदासीन आहे. तेलंगणा सरकारने या प्रस्तावातील अनेक बाबींवर अंमलबजावणी केली आहे.- शैलेश अग्रवाल, प्रणेते, एकच मिशन शेतकरी आरक्षण.

टॅग्स :agricultureशेतीGovernmentसरकार