शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

लोकमतच्या हवाई सफरीचा आनंद आभाळा एवढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 21:56 IST

सेलू सारख्या ग्रामीण भागात राहत असल्याने आकाशातून कधी विमान जातानाचा आवाज आला की हातचे सर्व सोडून आम्ही अंगणात येवून आकाशात विमानाचा शोध घ्यायचो. ते पाहिल्यावर विमानात बसण्याची इच्छा व्हायची. ‘लोकमत’ च्या ‘संस्काराचे मोती’ या उपक्रमातून संपूर्ण वर्धा जिल्ह्यातून एकमेव माझी नागपूर-दिल्ली विमानप्रवासाठी निवड झाली.

ठळक मुद्देदीपचंद चौधरी विद्यालयाच्या साक्षी पाटीलचे अनुभव कथन

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : सेलू सारख्या ग्रामीण भागात राहत असल्याने आकाशातून कधी विमान जातानाचा आवाज आला की हातचे सर्व सोडून आम्ही अंगणात येवून आकाशात विमानाचा शोध घ्यायचो. ते पाहिल्यावर विमानात बसण्याची इच्छा व्हायची. ‘लोकमत’ च्या ‘संस्काराचे मोती’ या उपक्रमातून संपूर्ण वर्धा जिल्ह्यातून एकमेव माझी नागपूर-दिल्ली विमानप्रवासाठी निवड झाली. त्यामुळे हवाई सफरीचे स्वप्नही पूर्ण झाले. ‘लोकमत’ च्या हवाई सफरीचा आनंद माझ्यासाठी आभाळा एवढा आहे, असे सांगून दीपचंद चौधरी विद्यालयाची विद्यार्थीनी साक्षी रमेश पाटील हिने आपले अनुभव कथन केले.काही निवडक शाळांमधून ‘लोकमत संस्काराचे मोती स्पर्धा’ हा उपक्रम राबविल्या जातो. साक्षी सातवीत असतांना या स्पर्धेची विजेती ठरली, ती आता आठवीत आहे. या उपक्रमाअंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांसोबत साक्षी विमानतळावर गेली. कुतुहलापोटी त्या परिसराचा कोपरा न कोपरा न्याहाळला. तेथील विमाने पाहून अक्षरश: आनंदाला पारावार राहीला नाही. विमानात बसल्यावर नागपूर वरुन दीड तासात दिल्लीला पोहोचले. विमानात कसे बसायचे तेथे कशी व्यवस्था असते हे विमानात बसल्यावर कळले. तो पर्यंत छातीचे ठोके वाढले होते. पहिल्यांदा विमानात बसत असल्याने मला विमानातील बारीक सारीक गोष्टी टिपतांना व मैत्रिणीशी गप्पा करताना दिल्लीला कसे पोहोचले हे कळलेच नाही. दिल्लीच्या विमान तळाचा झगमगाट पाहून स्वर्गाचा आनंद झाला. दुपारी १.३० च्या सुमारास संसद भवनात पोहोचले. येथे ना. नितीन गडकरी, ना. अ‍ॅड. संजय धोत्रे या मान्यवरांनी आमचे स्वागत केले. सर्वांशी मन मोकळा संवाद साधला. राष्ट्रपती भवन, संसद भवन, इंडिया गेट, ऐतिहासिक लालकिल्ला व बरेच काही डोळ्यात साठविले. रात्री १० वाजता दिल्ली विमानतळावरुन आम्ही नागपूरकडे उड्डाण केले. हे सर्व लोकमतच्या संस्काराचे मोती या स्पर्धेमुळेच साध्य झाल्याचेही साक्षीने यावेळी सांगितले.माझी मुलगी सातवीत शिकत असताना शाळेत लोकमत संस्काराचे मोती स्पर्धा सुरू झाली. मुलीच्या आग्रहाने मी घरी लोकमत सुरू केला. ती रोज लोकमतला येणारा परिपाठ वाचून कात्रणे कापून ठेवायची. प्रवेशिकेवर चिपकवायची यातून तिच्या ज्ञानातही खूप भर पडली व आज ती जिल्ह्यातून विजेती ठरल्याने तिची विमान प्रवासासाठी निवड झाली. माझ्या मुलीचे घरी येवून खुप जनांनी अभिनंदन केले. मी लोकमतचा ऋणी आहे.- रमेश पाटील, साक्षीचे वडिल, सेलू.

टॅग्स :Lokmatलोकमत