शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

गांधी सांगण्याची नव्हे जगण्याची गोष्ट आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 22:38 IST

गांधीजींची कर्मभूमी व प्रयोगभूमी सेवाग्राम असून १० वर्षांच्या वास्तव्यात अनेक कार्यक्रम येथून राबविले गेले.

ठळक मुद्देश्रीराम जाधव : राज्यव्यापी प्रशिक्षण कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : गांधीजींची कर्मभूमी व प्रयोगभूमी सेवाग्राम असून १० वर्षांच्या वास्तव्यात अनेक कार्यक्रम येथून राबविले गेले. दिल्लीनंतर या भूमीला महत्त्व प्राप्त झाले होते. गांधी सांगण्याची नव्हे तर जगण्याची गोष्ट आहे. तेव्हाच खºया अर्थाने बापू कळेल, असे मत सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे मंत्री प्रा.डॉ. श्रीराम जाधव यांनी व्यक्त केले.जगाच्या इतिहासात आंदोलने व क्रांती मोठ्या शहरात झाल्या; पण गांधीजींनी सत्याग्रह व असहकाराची चळवळ खेड्यापाड्यातून सुरू केली. महात्मा गांधीजींबाबत समाजात अनेक गैरसमज आहेत. ते दूर करण्यासाठी त्यांच्या जीवन पद्धतीचा व तत्त्वांचा गंभीरतेने विचार व अंगीकार करावा लागेल, असेही त्यांनी सांगितले.यात्री निवासच्या आचार्य दादा धर्माधिकारी सभागृहात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने गांधी १५० च्या निमित्ताने राज्यव्यापी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ते बोलत होते. अतिथी म्हणून महाराष्ट्र अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील, डॉ. रवींद्र रूख्मिनी, डॉ. उल्हास जाजू, सुनील स्वामी, माधव बावगे आदी उपस्थित होते.पाटील म्हणाले की, विवेकवादी गांधी समजावून घेण्यासाठी गांधींचे अनुयायी होण्यापेक्षा त्यांचे सहकारी बनण्याची गरज आहे. इतिहासातील ओझे वर्तमानात घेऊन न जगता त्या परिस्थितीत गांधी कसे जगले, हे समजावून घेणे गरजेचे आहे. डॉ. रूख्मिनी यांनी कार्यकर्ता कसा घडावा यापेक्षा गांधी कार्यकर्त्यांप्रमाणे जगले. यातून कार्यकर्ते घडले, असे सांगितले. डॉ. जाजू यांनी संघटनात्मक शक्तीतून सामाजिक स्तरावरील कार्य व्हावे. कर्माला पूजा माणून कृतिशील कार्य व्हावे. दुसºयांच्या सेवेतून मानवाची प्रगती होते, असे सांगितले. प्रा. शेखर सोनारकर यांनी खरा विवेकी गांधी समाजापर्यंत पोहोचविण्याची गरज व्यक्त केली. प्रारंभी प्रकाश कांबळे यांनी प्रबोधन गीत सादर केले. प्रास्ताविक गजेंद्र सुरकार, संचालन अजय सावरकर व सारिका डेहनकर यांनी केले तर आभार सुनील स्वामी यांनी मानले.