शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

आॅटोतून विद्यार्थ्यांची वाहतूक करणे महागात पडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 21:47 IST

प्रवासी वाहतुकीचा परवाना असलेल्या आॅटो रिक्षातून कुठल्याही पद्धतीने विद्यार्थ्यांची वाहतूक करू नये, अशा सूचना न्यायालयाच्या आहेत. परंतु, वर्धा जिल्ह्यातील विविध भागात या सूचनांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे लक्षात आल्याने उपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने १ जुलैपासून विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे१ जुलैपासून विशेष मोहीम । उपप्रादेशिक परिवहनच्या दोन चमू सज्ज

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : प्रवासी वाहतुकीचा परवाना असलेल्या आॅटो रिक्षातून कुठल्याही पद्धतीने विद्यार्थ्यांची वाहतूक करू नये, अशा सूचना न्यायालयाच्या आहेत. परंतु, वर्धा जिल्ह्यातील विविध भागात या सूचनांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे लक्षात आल्याने उपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने १ जुलैपासून विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी सदर विभागाने दोन चमू सज्ज केल्या असून या चमूतील अधिकारी नियमांना बगल देणाऱ्या आॅटाचालकांवर दंडात्मक आणि फौजदारी कारवाई करणार आहेत.प्रवासी वाहतुकीचा परवाना असलेल्या एका आॅटो रिक्षातून १२ वर्षावरील तीन जणांची वाहतूक करणे क्रमप्राप्त आहे. शिवाय तसा नियम आहे. परंतु, सध्या सदर नियमाला डावलूनच आॅटो रिक्षाचालक प्रवासी वाहतूक करीत असल्याचे पाहावयास मिळते. विशेष म्हणजे, कुठल्याही प्रवासी वाहतुकीचा परवाना असलेल्या आॅटो रिक्षातून विद्यार्थ्यांची ने-आण करू नये, अशा स्पष्ट सूचना न्यायालयाच्या आहेत. परंतु, काही आॅटोचालक मनमर्जीनेच विद्यार्थ्यांची वाहतूक करीत असल्याचे उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या निदर्शनास आले आहे. हा प्रकार न्यायालयाच्या सूचनांना पाठ दाखविणारा असल्याने तसेच एखाद्या मोठ्या अनुचित घटनेला आमंत्रण देणारा असल्याने मनमर्जीने काम करणाºया आॅटोचालकांना वठणीवर आणण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभाग १ जुलैपासून जिल्ह्यात विशेष मोहीम राबविणार आहे. त्यासाठी दोन चमू तयार करण्यात आल्या आहेत. या चमूतील अधिकारी व कर्मचारी जिल्ह्यातील विविध भागात प्रत्यक्ष जाऊन नियमांना पाठ दाखविणाऱ्यांवर कारवाई करणार आहे.१७४ स्कूल बससेचा परवाना केला निलंबितउपप्रादेशिक परिवहन विभागाने तब्बल १७४ स्कूल बसेसचा परवानाच निलंबित केला आहे. या बसेसमधून जर विद्यार्थ्यांची वाहतूक करताना आढळल्यास ते वाहनच जप्त करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात एकूण ४७४ छोट्या-मोठ्या स्कूल बसेस आहेत.प्रवासी वाहतुकीसाठी ३ हजार १६८ आॅटोरिक्षांची नोंदणीवर्धा जिल्ह्यात एकूण ५ हजार आॅटो रिक्षा असल्याची नोंद घेण्यात आली आहे. त्यापैकी ३ हजार १६८ आॅटो रिक्षांना प्रवासी वाहतुकीचा परवाना देण्यात आला आहे. परंतु, एखाद्या आॅटो रिक्षातून विद्यार्थ्यांची वाहतूक केली जात असल्याचे या मोहिमेदरम्यान निदर्शनास आल्यास त्या आॅटोचा परवानाच उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून निलंबित करण्यात येणार आहे.मुख्याध्यापकांच्या अडचणीत पडणार भरज्या शाळेतील विद्यार्थ्यांची वाहतूक नियमबाह्यपणे आॅटो रिक्षातून होत आहे, अशा शाळेच्या मुख्याध्यापकावरही कारवाई करण्याचे उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या विचाराधीन आहे. त्याला वरिष्ठ अधिकाºयांकडून हिरवी झेंडी मिळाल्यास शाळेच्या मुख्याध्यापकांच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता आहे.विद्यार्थ्यांची सुरक्षा हा उद्देश केंद्रस्थानी ठेवून १ जुलैपासून विशेष मोहीम आम्ही राबविणार आहो. त्यासाठी दोन चमू सज्ज करण्यात आल्या आहेत. शिवाय परवाना निलंबित करण्यात आलेल्या १७४ स्कूल बसमधून जर विद्यार्थ्यांची वाहतूक होत आहे, असे आढळल्यास ती स्कूल बसच जप्त करण्यात येणार आहे.- विजय तिराणकर, सहा. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वर्धा.