शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळा लागला; पण रस्त्यांची कामे अद्यापही प्रलंबित

By admin | Updated: June 24, 2014 00:02 IST

परिसरातील रस्त्यांची बांधकामाच्या निकृष्ट दर्जामुळे दुरवस्था झाली आहे़ रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघातांत वाढ झाली आहे़ पावसाळा सुरू झाला असताना परिसरातील रस्त्यांची कामे प्रलंबित ठेवण्यात आलीत़

मोझरी (शे़) : परिसरातील रस्त्यांची बांधकामाच्या निकृष्ट दर्जामुळे दुरवस्था झाली आहे़ रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघातांत वाढ झाली आहे़ पावसाळा सुरू झाला असताना परिसरातील रस्त्यांची कामे प्रलंबित ठेवण्यात आलीत़ यामुळे नागरिकांत असंतोष पसरला आहे़ याकडे लक्ष देत किमान रस्त्यांची डागडुजी करावी, अशी मागणी होत आहे़मोझरी-कानगाव या सात किमी रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहे़ अनेक दिवसांपासून याकडे दुर्लक्ष होत आहे. या मार्गावर चार पुलांपैकी एका पुलावर ऐन मध्यभागी खड्डे पडले आहे़ यातून सळाखी बाहेर निघून वर्तुळाकार खड्डे तयार झालेत़ हा प्रकार झाकण्यासाठी संबंधित कंत्राटदाराने त्यावर माती टाकून खड्डे बुजविले; पण पावसामुळे चिखल निर्माण झाला आहे़ यात अनेकांना वाहने घसरल्याने अपघाताला सामोरे जावे लागले़ या पुलाची अद्यापही दुरूस्ती करण्यात आलेली नाही़ उर्वरित तीन पुलांवर मधोमध भगदाडे पडलीत़ बांधकाम विभाग यापासून अनभिज्ञ असल्याचे दिसते़ मोझरी-खानगाव-आंबोडा या १० किमी रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्ड्यांचेच साम्राज्य आहे़ यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे़स्वातंत्र्याची ६६ वर्षे लोटूनही मोझरी-कापशी या सहा किमी रस्त्याचे अद्यापही मजबुतीकरण व डांबरीकरण पूर्णत्वास गेलेले नाही़ मोझरी-पोटी या तीन किमी रस्त्यावर सर्वत्र खड्डेचे खड्डे आहेत. मोझरी-कोसुर्ला या चार किमी रस्त्याचे डांबर पूर्णत: उखडले आहे; पण अद्याप रस्त्याची दुरूस्ती करण्यात आलेली नाही़ कंत्राटदार केवळ संबंधित कामे पार पाडून आपले देयके काढून मोकळे होत असल्याचे दिसते़ दर्जाहीन कामांमुळे अल्पावधीत खराब होणाऱ्या रस्त्याने प्रवास करताना वाहन धारक व सामान्यांना त्रास सहन करावा लागतो़ वर्धा ते राळेगाव या राज्यमार्गावरील पाथरी चौरस्ता ते कापशी या १३ किमी रस्त्याचे अद्यापही रुंदीकरण करण्यात आले नाही़ यामुळे वाहन धारकांना त्रास सहन करावा लागत आहे़ वाढती रहदारी लक्षात घेता कानगाव-मोझरी रस्त्याचेही रुंदीकरण करणे गरजेचे झाले आहे़सार्वजनिक व जि़प़ बांधकाम विभागाचे मात्र या ग्रामीण रस्त्यांकडे दुर्लक्ष होत आहे़ परिसरातील रस्त्यांची त्वरित दुरूस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे़(वार्ताहर)