शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

धर्माच्या आचरणासोबतच न्यायनीतीवर चालणे महत्त्वाचे

By admin | Updated: November 30, 2015 02:03 IST

आज मानवता सगळीकडे लोप पावत आहे. धर्माच्या आचरणासोबतच न्यायनीतीवर चालणे सगळेजण विसरले आहे.

ज्ञानेश्वरी दीदी : भागवत कथा सप्ताहदेवळी : आज मानवता सगळीकडे लोप पावत आहे. धर्माच्या आचरणासोबतच न्यायनीतीवर चालणे सगळेजण विसरले आहे. असेच वातावरण राहिले तर प्रलय निश्चित आहे. धर्माच्या आचरणासोबतच संतमहात्म व त्यांचे विचार अंगिकारून न्यायनीतीवर चालणे महत्त्वाचे असल्याचे ज्ञानेश्वरी दीदी आर्वी यांनी व्यक्त केले. स्थानिक श्रीसंत खटेश्वर महाराज पुण्यतिथी महोत्सवानिमित्त आयोजित श्रीमद् भागवत कथा सप्ताहात त्या बोलत होत्या. मानवाने मानवाप्रमाणे वागणे हीच मानवधर्म शिकविणारी कार्यशाळा आहे. आपल्या संस्कृतीला संतांच्या विचारांची जोड आहे. सर्वधर्म समभाव या विशालतेच्या आधारावर आपली प्रणाली कार्यरत आहे. त्यामुळे जात-पात न पाहता वैचारिक पात्रतेला महत्व द्या. आध्यात्मिक अनुष्ठानानुसार आपली जीवनपद्धती असू द्या. जीवनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत धर्माचे आचरण करा, असे ज्ञानेश्वरी दीदींनी प्रवचनात सांगितले.विवाहाचे महत्त्व विषद करताना त्यांनी अनेक दाखले दिले. सृष्टीचे चक्र चालावे यासाठी विवाहाचे महत्त्व आहे. परंतु विवाह संस्काराला आज काळीमा फासला जात आहे. हिंदू धर्मातील १६ संस्कारापैकी एक असलेल्या या संस्काराची पवित्रता राखली जात नसल्याचे शल्य आहे. आज कलियुगाच्या प्रवाहाने हुंड्याच्या वाढत्या मागणीसोबतच लग्नाच्या नावावर पैश्याचे शक्तीप्रदर्शन केले जात आहे. त्यामुळे विवाह हा आदर्श असला पाहिजे. सुसंस्कारिक पिढी जन्माला येण्यासाठी संस्काराचे प्रतिबिंब उमटले पाहिजे. वृक्ष किती मोठा झाला यापेक्षा हा वृक्ष लावला कुणी, याची वाच्यता झाली पाहिजे, असेही ज्ञानेश्वरी दिदी म्हणाल्या.खटेश्वर मंदिर परिसरात पाकशाळा बांधली जात असून त्याचा प्रारंभ खा. रामदास तडस यांच्या हस्ते झाला. श्रीमद् भागवत कथेचा समारोप ३० नोव्हेंबरला होत आहे. यादिवशी महाराजांच्या पादुकासहित शोभायात्रा, दिंडी महोत्सव तसेच महाप्रसादाचे आयोजन केले आहे.(प्रतिनिधी)