शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पाटबंधारे कामगार पूर्ववत कामावर येणार

By admin | Updated: May 30, 2014 00:18 IST

पाटबंधारे विभागात दहा ते बारा वर्षे काम केलेल्या ५२ कामगारांना झिरो बजेटच्या नावाखाली कमी केले होते. ही कपात अन्यायकारण असल्याचे म्हणत या कामगारांनी न्यायालयात धाव घेतली होती.

न्यायालयाचा आदेश : कामावरून केले कमीवर्धा : पाटबंधारे विभागात दहा ते बारा वर्षे काम केलेल्या ५२ कामगारांना झिरो बजेटच्या नावाखाली कमी केले होते. ही कपात अन्यायकारण असल्याचे म्हणत या कामगारांनी न्यायालयात धाव घेतली होती. यावेळी कामगारांच्या बाजूने निकाल लागला होता. यावर पाटबंधारे विभागाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने त्यांची याचिका खारीज करीत या कामगारांना कामावर घेण्याचा खालच्या न्यायालयाचा आदेश कायम ठेवत या कामगारांना कामावर परत घेण्याचा आदेश निर्गमित केला. सोबतच या कमागारांना टक्के बँक वेजेस देण्याच्या या आदेशात नमूद आहे. सन १९८७ साली सदर ५२ कामगारांना पाटबंधारे विभागाने पैशाची बचत करण्याच्या नावाखाली कामावरून कमी केले होते. त्या आदेशाविरुद्ध कामगार न्यायालय नागपूर येथे सिटूच्या नेतृत्वाखाली प्रकरण दाखल केले. सदर प्रकरणाचा निकाल न्यायालयाने १८ ऑक्टोबर २00२ रोजी दिला. आदेशामध्ये सेवेची संलग्नता कायम ठेवून व बंद काळातील २५ टक्के बँक वेजेस देऊन पूर्ववत सेवेत घेण्याचा निर्णय दिला. कामगार न्यायालयाच्या या निर्णयाविरुद्ध पाटबंधारे विभाग औद्योगिक न्यायालय, नागपूर येथे अपिलात गेला. सदर न्यायालयाने १६ मार्च २00६ रोजी कामगार न्यायालयाचाच निर्णय कायम केला. या विरोधात पुन्हा पाटबंधारे विभाग उच्च न्यायालय नागपूर येथे अपिलात गेले. उच्च न्यायालयानेही खालच्या न्यायालयांचा निर्णय कायम ठेवला. यावरही पाटबंधारे विभागाच्यावतीने या कामगारांना कामावर परत न घेता पुन्हा उच्च न्यायालय डबल बेंच नागपूर येथे अपिल दाखल केले. सदर अपिलाचा निर्णयही कामगारांच्या बाजूने लागला. यावेळी कामगारांनी कामावर रूजू करून घेण्यासाठी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (सिटू)च्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन केले. पाटबंधारे विभाग पुन्हा सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली येथे अपिलात गेले होते. न्यायमूर्ती, सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली यांनी पाटबंधारे विभागाचे अपिल खारीज केले.  न्यायालयाच्या निर्णयानुसार कामागारांना कामावर परत घ्यावे, अशी मागणी आंदोलनात सहभागी कामगारांनी केली आहे. (प्रतिनिधी)