शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन प्रकल्प २०१८ पर्यंत पूर्णत्वास जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 23:33 IST

तत्कालीन शासनाच्या धोरणात्मक निर्णयाअभावी सिंचन प्रकल्प ३० वर्षांपासून रखडले आहे. परंपरागत कोरडवाहू शेती, पाणी नाही, शेतमालाला भाव नाही...

ठळक मुद्देरामदास तडस : ‘संकल्प से सिद्धी’चा शुभारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : तत्कालीन शासनाच्या धोरणात्मक निर्णयाअभावी सिंचन प्रकल्प ३० वर्षांपासून रखडले आहे. परंपरागत कोरडवाहू शेती, पाणी नाही, शेतमालाला भाव नाही अशा स्थितीत विदर्भात आत्महत्यांचे प्रमाण वाढले. यावर मात म्हणून पंतप्रधानांनी निम्न वर्धासह इतर ५० टक्के पूर्ण झालेल्या प्रकल्पांना २०१८ पर्यंत पूर्ण करण्याचा निर्णय घेतला, असे मत खा. रामदास तडस यांनी व्यक्त केले.कृषी विज्ञान केंद्र सेलसुराद्वारे संकल्प से सिद्धी हा २०२२ पर्यंत न्यू इंडिया मंथन कार्यक्रम नगर भवनात पार पडला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जि.प. कृषी पशुसंवर्धन सभापती मुकेश भिसे तर अतिथी म्हणून पं.स. सभापती विद्या भुजाडे, नगराध्यक्ष सुचिता मडावी, यवतमाळचे कृषी संशोधन संचालक डॉ. चंद्रकांत पाटील, अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती, गोविंद मोरे सांगली, उपविभागीय कृषी अधिकारी जी.आर. कापसे, मधुमक्षिका विकास केंद्राचे डॉ. गोपाल पालीवाल, न.प. उपाध्यक्ष प्रा. नरेंद्र मदनकर उपस्थित होते.शोषक किडीच्या उच्चाटनासह पांढºया माशीच्या नियंत्रणासाठी तंत्रज्ञानाची गरज आहे. यासाठी कृषी विद्यार्थ्यांनी शेतकºयांना अत्याधुनिक कृषी ज्ञानाची माहिती द्यावी. प्रगतशील शेतकºयांकडून पीक उत्पादनाचे रहस्य जाणून घेत संकल्प से सिद्धी या धाडसी उपक्रमाला पूर्णत्वास नेले पाहिजे, असे कृषी तज्ज्ञांनी सांगितले. माती परिक्षणाचे ७ हजार ५०० हेक्टरचे ध्येय पूर्ण झाले नाही. माती परिक्षणास शेतकºयांना तयार करावे. शेतकरी समृद्ध करण्यासाठी कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात कमी खर्चाच्या शेतीवर भर द्यावा, असे भिसे यांनी सांगितले. यावेळी कृषी महा. नागपूर, रामकृष्ण बजाज कृषी महा. पिपरी व सेलसुरा कृषी तंत्रविज्ञानच्या विद्यार्थ्यांना २०१७ ते २०२२ पर्यंतच्या संकल्प से सिद्धीबाबत शपथ देण्यात आली. प्रास्ताविक डॉ. प्रशांत उंबरकर यांनी, संचालन प्रा. उज्वला शिरसाट यांनी केले तर आभार डॉ. धनराज चौधरी यांनी मानले. कार्यक्रमाला आर्वीचे तालुका कृषी अधिकारी पी.डी. गुल्हाणे, आष्टीचे प्रमोद पेटकर, सेलूचे बापुराव वाघमारे, समुद्रपूरचे संजय हाडके, हिंगणघाटचे राष्ट्रपाल मेश्राम, वर्धेचे रेहपाडे व शेतकरी उपस्थित होते.