शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

वीजचोरांवर आयआर मीटरचा वचक

By admin | Updated: June 29, 2015 02:29 IST

वीज वितरण कंपनीला वीज चोरीमुळे फटका सहन करावा लागतो. अनेकदा ग्राहकांकडून मीटरमध्ये तांत्रिक बिघाड करून रिडींग कमी करण्याचे प्रकार घडतात.

जिल्ह्यात लावले ७५ हजार मीटर : अचूक रिडींगकरिता उपयुक्तश्रेया केने  वर्धावीज वितरण कंपनीला वीज चोरीमुळे फटका सहन करावा लागतो. अनेकदा ग्राहकांकडून मीटरमध्ये तांत्रिक बिघाड करून रिडींग कमी करण्याचे प्रकार घडतात. यामुळे देयक कमी होते. यात महावितरणला नुकसान सोसावे लागते. या प्रकाराला आळा घालण्यासाठी घरोघरी इन्फ्रारेड मीटर लावण्याची मोहीम सुरू करण्यात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ७५ हजार मीटर बसविण्यात आले आहे. वीज चोरीवर आळा घालण्यासाठी महावितरण कंपनीच्यावतीने विविध उपाययोजना आखल्या जातात. तरीही वीज चोरी व विजेचा तुटवडा कायम आहे. त्यामुळे हा प्रयोग जिल्ह्यात अधिक प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्यावतीने विद्युत ग्राहकांच्या घरी चुंबकीय तत्वावर आधारित वीज मीटर लावण्यात आले होते. या मिटरमध्ये असलेली चक्री विशिष्ट वेळ फिरल्यानंतर एक एक युनिट वीज वापरल्याचे ग्राह्य धरले जात होते. त्यानुसार ग्राहकांना वीज देयक दिले जात होते. यांत्रिकी पद्धतीवर आधारित या वीज मीटरमध्ये हेराफेरी करण्याचे प्रमाण वाढले होेते. विद्युत मंडळाचे सील लावले जात असले, तरी क्लृप्त्या वापरून वीज मीटरमध्ये हेराफेरी होत असल्याचे प्रकार समोर आले आहे. याचा फटका महावितरणला सहन करावा लागत असल्याने जुने मीटर काढून रिडींगमध्ये पारदर्शक मीटर लावले आहेत. या मीटरमध्ये सुद्धा हेराफेरी होत असल्याचे महावितरण कंपनीच्या निदर्शनास आले. त्यानंतर रिडींग घेण्यासाठी फोटो पद्धती अंमलात आणली. मात्र यावरही वीज चोरीचे प्रमाण थांबले नाही. त्यामुळे महावितरणने हा निर्णय घेतला आहे. महावितरणकडून गत दोन वर्षांत ७५ हजार मीटर लावण्यात आले. यात वर्धा, पुलगाव, हिंगणघाट, आर्वी या शहरी भागात याची अंमलबजावणी करण्यात आली. यासह ग्रामीण भागात ग्राहकांच्या घरी इन्फ्रारेड मीटर लावण्यात आले आहेत. पुढील काही वर्षांत जिल्हाभरातील ग्राहकांकडे हे मीटर लावण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. इन्फ्रारेड मीटरमध्ये फेरफार करणे शक्य होत असल्याने रिडींग अचूक मिळण्याची शक्यता असते. यामुळे वीज वापराऐवढे देयक देऊन आर्थिक तुट सोसावी लागत नाही. या मीटरची उपलब्धता वेळेवर होत नसल्याने मीटर बसविण्याचे काम टप्प्याटप्प्याने करावे लागते.नवीन जोडणीच्यावेळी आयआर मीटर बसविणे अनिवार्य करण्यात आले आहे. पथकाला तपासणी करताना जुने मीटर लावलेले आढळल्यास आयआर मीटर लावले जाते. याशिवाय अनेक जुने मीटर बदलवून करण्यात आले. तरीही मीटरची अनुपलब्धता असल्याने प्रतीक्षा करावी लागते.मुख्यालयाच्या आदेशानुसार इलेक्ट्रोमेकॅनिकल बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे चक्रीमीटर बाद झाले असून नवीन जोडणी करताना आयआर मीटर देण्यात येते. ग्रामीण भागात आजही चक्री मीटर आहेत. याला बदलविण्यासाठी या मोहिमेत कार्य होणार आहे.