शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राट दिलेल्यांनाच बोलवा प्रचार करायला; कार्यकर्त्यांचा सूर

By admin | Updated: October 6, 2014 23:16 IST

आर्वी विधानसभा मतदार संघात अनेक कामे करण्यात आलीत़ ही कामे अनेक उमेदवारांनी घडवून आणली आहेत़ या कामांचे कंत्राट मिळावे म्हणून अनेक कार्यकर्त्यांनी फिल्डींग लावली होती; पण ती कामे भलत्याच

अनिल रिठे - तळेगाव (श्या़पं़)आर्वी विधानसभा मतदार संघात अनेक कामे करण्यात आलीत़ ही कामे अनेक उमेदवारांनी घडवून आणली आहेत़ या कामांचे कंत्राट मिळावे म्हणून अनेक कार्यकर्त्यांनी फिल्डींग लावली होती; पण ती कामे भलत्याच कंत्राटदारांना देण्यात आली़ यामुळे सध्या मतदार संघातील कार्यकर्ते नाराज असून ज्यांना कंत्राट दिले, त्यांनाच प्रचारासाठी बोलवा, असा नाराच नाराज कार्यकर्ते देत असल्याचे दिसते़ यामुळे उमेदवारांची मात्र गोची झाली आहे़मतदार संघातील तुरळक कंंत्राटदार वगळता अन्य मतदार संघ व अन्य जिल्ह्यातील कंत्राटदारांना आर्वी विधानसभा मतदार संघातील कामे देण्यात आली़ लहान-सहान कामेही कार्यकर्त्यांना देण्यात आली नाहीत़ यामुळे दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते उमेदवारांवर नाराज असल्याचे दिसते़ प्रचारासाठी उमेदवारांचा फोन जाताच ज्यांना कामे दिलीत त्यांनाच प्रचाराला बोलवा, असे स्पष्ट शब्दात सुनावले जात आहे़ यामुळे उमेदवारांची पंचाईत झाली आहे़ हा प्रकार कुण्या एकाच उमेदवारासोबत घडतोय, अशातला भाग नाही तर रिंगणातील बहुतांश उमेदवारांना हे बोल ऐकावे लागत असल्याचे दिसून येत आहे़ दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराला आता सुरूवात झाली आहे़ जाहीर सभा, रॅली, बैठकी आदींसाठी कार्यकर्त्यांची गर्दी पाहिजे असते़ उमेदवारांचे शक्तीप्रदर्शन दिसायला हवे, यासाठी उमेदवारांचे निकटस्थ जीवाचे रान करताना दिसतात़ वॉर्ड, गाव प्रमुख, सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, सहकारी संस्थाचे संचालक, पदाधिकारी येथपासून सर्वच गर्दी जमविण्याच्या मागे लागले आहेत; पण दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे़ या दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांच्या वाट्याला पद, उमेदवारी येत नाही़ किमान लहान-मोठ्या कामांतून उत्पन्न मिळाले तर घर चालेल, अशी त्यांची अपेक्षा असते़ असे झाल्यास पक्षाला मदत करण्याची त्यांची मानसिकता असते; पण उमेदवारांना त्यांचा विसर पडत असल्याने ऐन निवडणुकीत अशा प्रसंगांना सामोरे जावे लागते़ सध्या आर्वी मतदार संघात याचा अनुभव अनेकांना येताना दिसतो़