शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शेतातील लोंबकळणाऱ्या विद्युत तारा देताहेत मृत्यूला निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 22:12 IST

कपाशी व तुरीच्या पिकांवर विद्युत खांबावरील जिवंत वीज तारा लोंबकळत असल्याने शेतकऱ्यांसह कापूस वेचणाऱ्या मजुरांचा जीव धोक्यात सापडला आहे.

ठळक मुद्देमहावितरणचे तक्रारीकडे दुर्लक्ष : समस्या सोडविण्याची गावकऱ्यांची मागणी

आॅनलाईन लोकमतकेळझर : कपाशी व तुरीच्या पिकांवर विद्युत खांबावरील जिवंत वीज तारा लोंबकळत असल्याने शेतकऱ्यांसह कापूस वेचणाऱ्या मजुरांचा जीव धोक्यात सापडला आहे. याबाबत अनेकदा महावितरणकडे संबंधित शेतकऱ्याने तक्रारी केल्या; परंतु त्या तक्रारीची अधिकारी, कर्मचारी वर्गाने दखलच घेतली नाही. या जिवंत तारांचा करंट लागून एखाद्याचा जीव गेल्यानंतर महावितरणाला जाग येईल का? असा सवाल उपस्थित केल्या जात आहे.आमगाव (खडकी) येथील शेतकरी अमोल जांबुतकर यांचे मौजा आमगाव येथे शेत आहे. सध्या या शेतात कपाशी व तुरीचे पीक आहे. त्यांच्या शेतात विद्युत खांबावरील जिवंत वीज तारा लोंबकळून तुरीच्या झाडांना लागलेल्या आहे. हाताने पकडणे शक्य होईल इतक्या खाली या वीज तारा आल्या आहेत. शेतात सध्या कपाशी वेचाई सुरू असल्याने मजुरांचा जीव धोक्यात आला आहे. अनावधानाने जर एखाद्या मजुराच्या हाताचा स्पर्श या लोंबकळणाऱ्या जिवंत ताराला झाला तर जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच भीतीने शेतकऱ्यांसह शेतमजुरीही धास्तावले आहेत. नाल्यातील रसायनयुक्त पाण्याच्या प्रकरणी सेलूचे तहसीलदारांनी गावात भेटीदरम्यान पाहणी केली असता ग्रामस्थांनी ही बाब त्यांच्याही निदर्शनास आणून दिली, हे विशेष. तरी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी अनुचित प्रकार घडण्याआधी याकडे लक्ष देत जांबुतकर यांच्या शेतातील लोंबकळणाऱ्या विद्युत तारांना सरळ करण्याची मागणी आमगावच्या ग्रामस्थांनी केली आहे. याकडे दुर्लक्ष करून एखादी अनुचित घटना घडल्यास त्याची जबाबदारी महावितरणवर राहील असे सांगण्यात आले आहे.अनवधानाने स्पर्श झाल्यास अपघाताचा धोकाशेतात सध्या कपाशी वेचाई सुरू असल्याने मजुरांचा जीव धोक्यात आला आहे. अनावधानाने जर एखाद्या मजुराच्या हाताचा स्पर्श या लोंबकळणाऱ्या जिवंत ताराला झाला तर जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच भीतीने शेतकऱ्यांसह शेतमजुरीही धास्तावले आहेत. अनेकदा मजूर शेतात येण्यास धजावत नाही अशी व्यस्था शेतकरी मांडतात.