शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

भूदानातील शेतजमिनीच्या घोटाळ्याची चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 22:34 IST

जिल्ह्यामध्ये १९८० हेक्टर जमीन भूदानातील असून त्यातील ११८ हेक्टर जमिनीचे अद्याप वाटप झालेले नाही. अलीकडच्या काळात भूदान गरिबांना न देता त्या जमिनी धनदांडगे व शिक्षण संस्थाधारकांना वितरित झाल्या आहे. त्यावर कुणी अतिक्रमण केल्याचे, कुठे भूखंड पाडल्याची प्रकरणे उजेडात येत आहेत.

ठळक मुद्देरामदास तडस यांनी संसदेत मांडला मुद्दा : केंद्रीय गृहमंत्र्यांचे वेधले लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यामध्ये १९८० हेक्टर जमीन भूदानातील असून त्यातील ११८ हेक्टर जमिनीचे अद्याप वाटप झालेले नाही. अलीकडच्या काळात भूदान गरिबांना न देता त्या जमिनी धनदांडगे व शिक्षण संस्थाधारकांना वितरित झाल्या आहे. त्यावर कुणी अतिक्रमण केल्याचे, कुठे भूखंड पाडल्याची प्रकरणे उजेडात येत आहेत. विनोबा भावे यांनी भूदान चळवळीमध्ये जी शेतजमीन मिळविली, त्यातील काही जमीन गरजूंना देण्यात आली; परंतु शेती करण्याचे भान त्यापैकी अनेकांना नसल्यामुळे या जमिनी तशाच पडून होत्या. शिल्लक जमिनी अधिकारी, भूमाफिया व शैक्षणिक संस्थेच्या संगनमताने श्रीमंत, बिल्डर व संस्थांना विकण्यात आल्या आहे. सर्व भूदानातील जमिनी देशातील भूमिहीन गोरगरिब तसेच सरकारी कार्याकरिता मिळावी खासदार रामदास तडस यांनी शेतजमिनीमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी याकरीता लोकसभेत शून्य प्रहरांतर्गत प्रश्न उपस्थित केला.आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळीचा प्रारंभ वर्धा लोकसभा क्षेत्रातील सेवाग्राम येथून ७ मार्च २०१५ ला व आंध्र प्रदेशातील शिवरामपल्ली आजच्या तेलंगणा राज्यातील नालगोंडा जिल्ह्यातील पोचमपल्ली या गावातून झाला. यात त्यांनी श्रीमंत शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीचा काही हिस्सा भूमिहीन, हरिजन लोकांना दान करण्याचे आवाहन केले. हळूहळू त्यांनी चळवळीचा व्याप वाढवत नेला. आंध्र प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक, उडिशा व महाराष्ट्र या सर्व राज्यात भूदान चळवळीसाठी विनोबाजी पायी फिरले. सर्व राज्यात त्यांना प्रचंड, सकारात्मक प्रतिसाद मिळाला.यावेळी आचार्य विनोबा भावे यांनी ४० हजार मैल पायदळ यात्रा करून २२.९० लाख जमीन भूदानामध्ये संग्रह करण्यात आली. ते ऐतिहासिक कार्य होते. या चळवळीतून जमा झालेल्या जमिनीतून देशातील १६.६६ लाख एकर जमीन भूमिहिनांना देण्यात आली. या जमिनीपैकी ६.२७ लाख एकर जमीन संस्थांकडे शिल्लक राहिली. भूदान मधील शिल्लक असलेल्या जमिनी अधिकारी, भूमाफिया व शैक्षणिक संस्थांच्या संगनमताने श्रीमंत, बिल्डर आणि संस्थांना विकण्यात आल्या आहेत. या सर्व भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी वर्धा लोकसभा मतदार संघाचे खासदार रामदास तडस यांनी गृहमंत्री यांच्याकडे लोकसभेत शून्य प्रहरात केली.आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळीच्या माध्यमातून गोरगरिबांना जमीन मिळावी याकरिता प्रयत्न केले. परंतु, त्यांनी केलेल्या या कार्याला अधिकारी, भूमाफिया व शैक्षणिक संस्था यांनी भ्रष्टाचार करून स्वत:च्या फायद्याकरिता जमिनीचा उपयोग केला. या भ्रष्टाचाराची चौकशी झाल्यास अनेक प्रकरणे बाहेर येऊन भूदानमधील जमीन गोरगरिबांना व सरकारी कार्याकरिता उपयोग होईल, असा विश्वास यावेळी खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Ramdas Tadasरामदास तडस