शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

राहूल गांधी यांच्यावरील हल्ल्याचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 01:30 IST

पूर पीडितांची व्यथा समजून घेण्यासाठी गुजरात मध्ये गेलेल्या काँग्रेसचे उपाध्यक्ष राहूल गांधी यांच्या गाडीवर काहींनी दगडफेक केली.

ठळक मुद्देआर्वी व वर्धेत उमटले पडसाद : दोषींवर कठोर कार्यवाही करा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पूर पीडितांची व्यथा समजून घेण्यासाठी गुजरात मध्ये गेलेल्या काँग्रेसचे उपाध्यक्ष राहूल गांधी यांच्या गाडीवर काहींनी दगडफेक केली. हा प्रकार निंदनिय असून या घटनेतील दोषींवर कठोर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून महिला काँग्रेसच्यावतीने करण्यात आली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हुकुमशाहीचा अवलंब करीत असल्याने तसेच भाजपाचीही हुकुमशाही दिवसेंदिवस वाढत असल्याने आम्ही त्याचा निषेध करतो. गुजरात मधील बनासकांठा या पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी व नागरिकांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी गेलेल्या काँग्रेसच्या उपाध्यक्ष राहूल गांधी यांच्या वाहनावर काहींनी दगडफेक केली. हा प्रकार लोकशाहीचा गळा दाबून त्याची हत्या करणाराच आहे. भारत हा लोकशाही स्वीकारणारा देश असून या घटनेतील आरोपींवर कठोर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. सदर निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी यांनी स्वीकारले. निवेदन देताना महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष हेमलता मेघे, सायली वंजारी, जोत्स्रा ढाले, वादाफळे, वानखेडे, मुटे, जया गायधने, नलिनी भोयर, पवार, रंजना पवार, छाया पुरके, कुंदा भोयर, योगीता मानकट आदींची उपस्थिती होती.उपविभागीय अधिकाºयांना निवेदनआर्वी - काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांच्यावरील भ्याड हल्ला ही लोकशाहीला काळीमा फासणारी आहे. या घटनेतील हल्लेखोरांवर सरकारने कठोर कारवाई करावी, अशी मागणी आर्वी शहर काँग्रेस कमिटी व युवक काँग्रेस तर्फे उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपतींकडे करण्यात आली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी गुजरात मधील बनासकांठा येथे पूरग्रस्तांना भेटण्यासाठी गेले होते. दरम्यान त्यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली. राहुल गांधी यांच्या सुरक्षेची जबाबदारी गुजरात राज्य सरकारची असताना राज्य सरकारकडून सुरक्षा व्यवस्थेत जाणिवपूर्वक कमतरता ठेवण्यात आल्याचा आरोप निवदेनातून करण्यात आला आहे. या घटनेतील आरोपींवर कठोर कारवाईची मागणीही करण्यात आली आहे. निवेदन देताना सुधीर वाकोडकर, धनंजय चौबे, बाबाराव अवथळे, मधुकर सोमकुवर, कृष्ण भाकरे, गजानन गावंडे, सचिन वैद्य, अमोल दहाट, अ‍ॅड दीपक मोटवाणी, महादेव निखाडे, रज्जाक अली, भोजराज भोवरे, राजू रत्नपारखी, प्रविण कडू, गंगाधर तायवाडे, पद्माकर मुडे, स्वप्नील कैलुके, प्रविण खोंडे, संजय पडोळे, किशोर सेलोकर, ललित साहु, मिलींद आवते, रवी नाखले, सुनील साळवे, कैलास जैन, टिकाराम चौधरी, चंद्रकांत राऊत, राहुल बोरघडे आदी उपस्थित होते.