शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गाच्या कामासाठी अवैध उत्खनन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 05:00 IST

महामार्गाच्या कामासाठी अल्लीपूरपासून ५ कि.मी. अंतरावर धोत्रा गावाजवळ शेतकऱ्यांच्या शेतातील मुरूम व माती मोठ्या प्रमाणावर खोदून नेण्यात येत आहे. शेतकऱ्यांची कुठलीही परवानगी न घेता त्रिनेवा इन्फ्रा प्रायव्हेट लिमीटेड कंपनीने १० फुट खोल खड्डे करून खोदकाम करून माती व मुरूम रस्ता कामासाठी वापरला आहे. हिंगणघाट-वर्धा रस्त्याचे सिमेंटीकरण करण्यात येत आहे.

ठळक मुद्देधोत्रा परिसरातील शेतकरी अडचणीत : मुरुम, मातीचा सर्रास वापर

लोकमत न्यूज नेटवर्कअल्लीपूर/वर्धा : समृध्दी महामार्गात अ‍ॅपकॉन कंपनीने मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या मुरूम, माती चोरून नेल्याचे प्रकरण उघडकीस आले असताना असाच प्रकार पुन्हा त्रिनेवा इन्फ्रा प्रायव्हेट लिमीटेड कंपनीच्या माध्यमातून अल्लीपूर परिसरात सुरू असल्याचे दिसून येत आहे. हिंगणघाट- वर्धा या महामार्गाचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे.या महामार्गाच्या कामासाठी अल्लीपूरपासून ५ कि.मी. अंतरावर धोत्रा गावाजवळ शेतकऱ्यांच्या शेतातील मुरूम व माती मोठ्या प्रमाणावर खोदून नेण्यात येत आहे. शेतकऱ्यांची कुठलीही परवानगी न घेता त्रिनेवा इन्फ्रा प्रायव्हेट लिमीटेड कंपनीने १० फुट खोल खड्डे करून खोदकाम करून माती व मुरूम रस्ता कामासाठी वापरला आहे. हिंगणघाट-वर्धा रस्त्याचे सिमेंटीकरण करण्यात येत आहे.कंपनीकडून करण्यात आलेल्या या खोदकामामुळे परिसरातील शेतकरी त्रस्त झाले आहेत. स्थानिक प्रशासन या बाबीकडे कानाडोळा करीत असल्याचे दिसून येत आहे. महसूल प्रशासनाकडे या संदर्भात तक्रारी करण्यात आल्या, मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. अनेक भागात मुरूम व माती काढण्यात आल्यामुळे मोठे खड्डे पडले असून शेकडो ट्रकच्या सहाय्याने मुरूम, मातीची वाहतुक केली जात आहे.मुरूम, माती काढल्याने येथे खड्डे निर्माण झाले.त्या खड्ड्यात पावसाचे पाणी जमा होवून तेथे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या कंपनीच्या शेकडो वाहनामुळे रस्त्याची पुरती वाट लागली आहे. मात्र कंपनीच्या या सर्व कारभाराला प्रशासनाचा आर्शिवाद असल्याचा आरोप शेतकºयांनी केला आहे.यापूर्वी जिल्ह्यात सेलू तालुक्यात अ‍ॅपकॉन कंपनीने अशाच प्रकारे मुरूम, माती अवैधरित्या चोरून नेली होती. याप्रकरणी सेलू पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यावर संबंधीत कंपनीच्या अधिकाºयाचा अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळून लावला आहे.अल्लीपूर भागातील या प्रकरणातही असाच प्रकार झाल्याचे दिसून येत आहे. अनेक शेतकºयांची परवानगी न घेताच त्यांचे शेत, परिसरातील रस्त्यालगतची जागा खोदली जात आहे.वर्धा - हिंगणघाट महामार्गाच्या कामात कंत्राटदार कंपनीकडून अवैधरित्या शेतकºयांच्या शेतातील मुरूम, माती काढून नेल्याच्या प्रकरणात अद्याप एकही तक्रार प्रशासनाकडे आलेली नाही. शेतकºयांची तक्रार आल्यास चौकशी करून कारवाई केली जाईल.- प्रीती डुडुलकर, तहसीलदार वर्धा.

टॅग्स :wardha-acवर्धा