खड्ड्यात पडून अनेकांना अपघात : दुर्लक्ष झाल्यास आंदोलनाचा इशारा साहूर : संपूर्ण भारतात ग्रामपंचायतींना आॅनलाईन करण्याचा निर्णय शासनाच्यावतीने घेण्यात आला आहे. याच आॅनलाईच्या कामाकरिता साहूर परिसरात केबल टाकण्याकरिता खड्डे खोदण्यात आले. हे खड्डे आज तसेच असून या खड्डयात पडून अनेक अपघात होत आहे. या खड्ड्यांमुळे नागरिकांचे आॅनलाईन अपघात होत असल्याच्या प्रतिक्रीया गावकऱ्यांकडून मिळत आहे. केबल टाकण्याकरिता खोदण्यात आलेल्या नाल्या ठेकेदाराने व्यवस्थती बुजविल्या नसल्याने येथे मोठ मोठे खड्डे कायम आहे. साहुरचे डॉ. प्रभाकर यांनी ठेकेदाराच्या जेसीबी चालविणाऱ्या कामागारांना नाल्या बुजविण्यासाठी हटकले, त्यांनी ठेकेदाराचा रस्ता रोकला. यावेळी ठेकेदराने नाल्या बुजविण्याचे आश्वासन दिले. आश्वासन देवून बेपत्ता झालेला ठेकेदार येथे अद्याप परत आला नसल्याने खड्डे आहे त्याच स्थिती आहे. या खड्डयांमध्ये शेतकऱ्यांची जनावरे पडून मरत आहेत. तर काही मोडत आहे. या मार्गाने एस.टी. महामंडळाच्या बस फेऱ्या कमी असल्यामुळे खासगी वाहणासाठी साहुर, बोरगाव, वडाळा, हा श्रतस सतत वर्दळीचा आहे. या नालीच्या खड्डयांमध्ये झाडे झुडपे वाढल्यामुळे या खड्ड्यांमुळे अपघात वाढत असल्याचे दिसून आले आहे.(वार्ताहर) खड्ड्यातील पाणी शेतात शिरल्याने पिकांचे नुकसानगावात येणाऱ्या या रस्त्यावर असलेल्या नाल्यांत पाणी साचून ते रस्त्यालगत असलेल्या शेतात शिरत आहे. यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शिवाय रस्त्यांवरील खड्डे वाटसरुंना, वाहनाने जाणाऱ्यांना दिसत नसल्याने त्या खड्ड्यांत पडून त्यांचे अनेक अपघात झाले आहेत. या नाल्यांचे खड्डे त्वरित जर बुजविले नाही तर सर्व त्रस्त शेतकरी व गावकरी या मार्गावर रस्तारोको सत्याग्रह करतील असा इशार गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. आकोली-खरांगणा ते बांगडापूर मार्ग खड्डेमयआकोली- खरांगणा ते बांगडापूर मार्ग खड्डेमय झाला असला तरी प्रशासन चक्क डोळेझाकपणा केला आहे. सदर रस्त्यावर महाकाय खड्डे पडले असल्याने वाहन कसे चालवावे असा प्रश्न पडतो. खरांगणा ते बांगडापूर हा वर्दळीचा मार्ग आहे. सदर मार्गावर महाकाली मंदिर, ढगा भुवन आहे. शिवाय कारंजा व कोढांळी कडे जाणाऱ्या वाहनांची मोठी वर्दळ आहे. या रस्त्यावर पावलो पावली मोठ मोठे खड्डे नजरेस पडतात. खरांगणा ते महाकाळी पर्यंत तर रस्त्याची गंभीर स्थिती आहे. महाकाळी पासून पुढे ३ कि़मी. अंतरापर्यंत दोन महिन्यापूर्वी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र हा नव्याने झालेला रस्ता सुद्धा उखडला आहे. तर कुठे दबला आहे. मासोद ते ढगा पाटीपर्यंत तर रस्त्याची खराब झाला आहे. सदर रस्त्यावर वाहन चालवणे धोकादायक झाले असून याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.(वार्ताहर)
इंटरनेट केबलचे खड्डे धोकादायक
By admin | Updated: October 17, 2016 01:14 IST