जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार : न्याय मिळवून देण्याची मागणीहिंगणघाट : स्थानिक रिठे कॉलनी ज्ञानेश्वर नगर येथील नरेश ऊर्फ जैराम निखाडे यांची रेणकापूर (बो.) ता. समुद्रपूर येथे वडिलोपार्जित जमीन आहे. यात सातबारावर नऊ वारसांची नावेही नमूद आहे. सदर जमिनीची परस्पर विक्री करण्यात आली. या प्रकरणी चौकशी करून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी निखाडे यांनी केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांना निवेदन देण्यात आले.नरेश निखाडे यांच्या मालकी व कब्जात रेणकापूर येथील शेत सर्व्हे क्र. १०/४, २.४३ हे.आर. व शेत सर्व्हे क्र. २/४, १.७७ हे.आर. वडिलोपार्जित शेतजमीन आहे. समुद्रपूर तालुक्यातील या जमिनीच्या सातबारा उताऱ्यामध्ये महसूल विभागात विलास जैराम निखाडे, उषा लक्ष्मण मुंगले, शालू उर्फ शालिनी भेंडे, सुधा मानकर, बेबी निखाडे, अमोल उर्फ अंकुश निखाडे, सोनू निखाडे, मोनाली बारई व नरेश निखाडे या सर्वांच्या संयुक्तिक नावांची नोंद आहे. शेत जमिनीच्या वारसांमध्ये कोणत्याही हिस्सेवाटण्या वा विभाजन झालेले नाही. संयुक्त नावाने महसूल अभिलेख असताना आणि भोगवटदार नरेश निखाडे यांची संमती नसताना दुय्यम निबंधक कार्यालय समुद्रपूरद्वारे सदर जमीन चिमणलाल गोविंदराम मोटवानी रा. गुरूनानक वॉर्ड हिंगणघाट यांच्या हक्कात दस्त क्र. १६००/२०१५ हा नोंदणीकृत विक्रीखत ८ जुलै २०१५ रोजी करण्यात आली. कुठलीही परवानगी न घेता सदर जमिनीची परस्पर विक्री करून देण्यात आली. यामुळे निखाडे कुटुंबावर अन्याय झाला असून न्याय मिळवून देण्याची मागणी त्यांनी केली आहे.(तालुका प्रतिनिधी)
वडिलोपार्जित जमिनीची परस्पर विक्री
By admin | Updated: October 7, 2015 00:56 IST