शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

४९ हजार कुटुंबांशी साधणार संवाद

By admin | Updated: August 18, 2016 00:39 IST

स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) अंतर्गत २२ आॅगस्ट ते २ आॅक्टोबर या कालावधीत जिल्ह्यात कुटुंबस्तर संवाद अभियान राबविण्यात येत आहे.

कुटुंबस्तर संवाद अभियान : ४३७ ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छतेसाठी भेटीगाठी उपक्रम वर्धा : स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) अंतर्गत २२ आॅगस्ट ते २ आॅक्टोबर या कालावधीत जिल्ह्यात कुटुंबस्तर संवाद अभियान राबविण्यात येत आहे. शौचालय नसलेल्या कुटुंबांना नेमण्यात येणाऱ्या संवादकांमार्फत भेटी दिल्या जाणार आहेत. शिवाय जिल्ह्यातील २०१६-१७ या वार्षिक कृती आराखड्यात समाविष्ट ४३७ ग्रामपंचायतीमधील ४९ हजार २१८ कुटुंबांशी संवाद साधण्यात येणार आहे. यात ग्रामस्थांना शौचालयाचे महत्त्व सांगण्यात येणार आहे. स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) अंतर्गत शौचालयाचे प्रमाण वाढावे यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. जनजागृतीच्या माध्यमातून शौचालयाचे प्रमाण वाढवित असताना स्वच्छ भारत मिशनच्यावतीने प्रती शौचालय लाभार्थी १२ हजार रुपयांचा प्रोत्साहनपर पुरस्कारही देण्यात येत आहे. यामुळे हळूहळू ग्रामीण भागात शौचालयाचे प्रमाणही वाढत आहे. शासनाच्या निर्देशानुसार २०१६-१७ या वर्षात संपूर्ण वर्धा जिल्हा हागणदारी मुक्त करावयाचा आहे. त्यानुसार ४३७ ग्रामपंचायतमधील ४९ हजार २१८ कुटुंबांना गृहभेटी अभियानात भेट देऊन शौचालयाचे महत्त्व पटवून देण्यात येणार आहे. यात गावस्तरावरील ग्रामपंचायत पदाधिकारी, पाणी पुरवठा व स्वच्छता समिती सदस्य, गावस्तरीय कर्मचारी, विद्यार्थी, गट संसाधन केंद्रातील कर्मचारी, संपर्क अधिकारी आदी संवादक म्हणून काम करणार आहेत. प्रत्येक ग्रामपंचायतस्तरावर प्रती कुटूंब ५० याप्रमाणे तीन संवाद गट तयार केले जाणार आहेत. प्रत्येक गटात दोन संवादक राहणार आहे. अभियान कालावधीमधील गृहभेटीचा आढावा नियमित तालुकास्तरावरून जिल्हास्तरावर घेतला जाणार आहे. त्यांचा अहवाल शासनास नियमित दिला जाणार आहे. शासनाकडून गावे हागणदारीमुक्त करण्यासाठी निर्मलग्राम अभियान राबविले जात आहे. या अंतर्गत शौचालय निर्मितीचे उद्दीष्ट देण्यात आले आहे; पण ग्रामीण भागात शौचालयांप्रती जागरुकता नसल्याने गावे हागणदारी मुक्तीसाठीचे प्रयत्न सुरू आहेत.(कार्यालय प्रतिनिधी) अभियानाचा शुभारंभ ग्रामपंचायत स्तरावर गृहभेटी अभियानाचा शुभारंभ २२ आॅगस्ट रोजी ग्रामपंचायतस्तरावर करण्यात येणार आहे. यात स्थानिक पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, संवादक प्रत्यक्ष गृहभेटीद्वारे अभियानाचा शुभारंभ आपापल्या ग्रामपंचायतीमध्ये करणार आहेत. या अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागात शौचालय आणि स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत हागणदारीमुक्तीचे प्रयत्न होणार आहेत. सनियंत्रण अधिकारी अभियानाबाबत नियमितपणे माहिती जिल्हास्तरावर देण्याकरिता प्रत्येक तालुक्यात एका अधिकाऱ्याची सनियंत्रण अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे. या अधिकाऱ्याच्या माध्यमातून ग्रामीण भागातील अभियानाच्या प्रगतिबाबत जिल्हा प्रशासनाला माहिती देण्यात येणार आहे.